एसआयआयएलसी
डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण
पुणे, ता. २० : निर्जलीकरण व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट निर्जलीकरण उद्योग प्रकल्पात २२ व २३ नोव्हेंबरला आयोजिले आहे. प्रशिक्षणात निर्जलीकरण म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, निर्जलीकरणासाठीचे प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, निर्जलीकरणाद्वारे तयार होणारे घटक पदार्थ व त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, निर्जलीकरणासाठी लागणाऱ्या मशिनरी, फ्लो चार्ट, बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, जागेची निवड, गुंतवणूक, प्रकल्प अहवाल इ.विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.
कांदा पीक व्यवस्थापन
विनामूल्य ऑनलाइन कार्यशाळा
शेतकऱ्यांसाठी कांदा पिकाच्या शास्त्रीय लागवड तंत्रज्ञानावर आधारित विनामूल्य ऑनलाइन कार्यशाळा २३ नोव्हेंबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत मशागत व जमिनीची तयारी, उच्च उत्पन्न देणाऱ्या जातींची निवड, रोपवाटिका पद्धती, लागवड व्यवस्थापन, सिंचन तंत्र, खतांचा संतुलित वापर, कीड व रोग नियंत्रणासाठी जैविक आणि रासायनिक पर्याय, तण व्यवस्थापन, तसेच काढणी व साठवणुकीची पद्धत यांचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. याशिवाय कांदा प्रक्रिया उद्योग, पावडर, फ्लेक्स आणि मूल्यवर्धित उत्पादनांमधील व्यवसाय संधींची माहितीही देण्यात येईल. ही कार्यशाळा शेतकऱ्यांना उत्पादनक्षम व नफ्याची कांदा शेती करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार असून इच्छुकांसाठी सहभाग पूर्णपणे विनामूल्य आहे.
ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने
ॲमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कोणते कागदपत्रे लागतात, किती दिवस लागतात, हे सर्व करून बिजनेस कसा वाढवायचा, ॲमेझॉनवर विक्री करण्यास किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे आदींबाबत प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २९ नोव्हेंबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स असतील तर ते कसे हाताळावे, ॲमेझॉन ॲपवरती उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील जेणेकरून विक्री वाढेल, ऑफर कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, तत्काळ सपोर्ट कसा घ्यायचा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२
पुणे व पिंपरी-चिंचवड आवृत्ती
जीएसटी अकाउंट असिस्टंट,
ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन प्रशिक्षण
डॉ. नानासाहेब परुळेकर (सकाळ) चॅरिटेबल ट्रस्ट आणि टेक महिंद्रा फाउंडेशनच्या वतीने १८ ते ३५ वयोगटांतील तरुण-तरुणींसाठीचे विनामूल्य प्रशिक्षण वर्ग १ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. या रोजगाराभिमुख प्रशिक्षण वर्गांमध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘जीएसटी अकाउंट असिस्टंट’ आणि कला किंवा इतर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन’ हे कोर्सेस घेतले जातात. याबरोबरच विद्यार्थ्यांना संगणक, इंग्रजी संभाषण आणि व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी नोकरीच्या ठिकाणी गरजेची असणारी महत्त्वाची कौशल्ये देखील विनामूल्य शिकविली जाणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच नोकरी मिळवून देण्यासाठी खात्रीशीर साहाय्य पुरवले जाते. इच्छुक विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत पुढे दिलेल्या क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा दिलेल्या पत्यावर भेट द्यावी.
संपर्क : ८५५४०६९७९७/ ८६६८७६२२४० / ८७६७६९६२८८
ठिकाण : चाळ नंबर ८८/४, डांबर कोठी, नगरसेवक गौडा यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर, पर्वती दर्शन, स्वारगेट, पुणे

