‘यशदा रिॲल्टी’ची यशोगाथा आज ‘साम टीव्ही’वर
पुणे, ता. २२ : आपुलकी आणि विश्वासाचा पाया असलेल्या ‘यशदा रिॲल्टी’ची यशोगाथा ‘महाब्रँड्स’मधून मांडण्यात येणार आहे. महाराष्ट्रीयन ब्रँड्ना सलाम करणारा हा कार्यक्रम ‘साम टीव्ही’वर प्रसारित केला जाणार आहे. त्या अंतर्गत रविवारी (ता. २३) दुपारी तीन वाजून ३० मिनिटांनी ‘यशदा रिॲल्टी’चा प्रवास ‘साम टीव्ही’वर पाहायला मिळणार आहे.
कुटुंबात बांधकाम क्षेत्राशी संबंधित कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ आपली इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर ‘यशदा रिॲल्टी’चे व्यवस्थापकीय संचालक वसंत काटे यांनी बांधकाम व्यवसायात पदार्पण करून त्यामध्ये यश मिळविले. यश मिळविणे सोपे असते, मात्र मिळालेले यश वर्षानुवर्षे टिकवून ठेवत यशाची शिखरे गाठणे, हे सोपे नसते. ‘यशदा रिॲल्टी’ने मात्र हे साध्य करून दाखविले आहे. ‘यशदा रिॲल्टी’चा आजपर्यंतचा प्रवास पाहिला, तर तो अत्यंत थक्क करणारा असून, या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या उद्योजकांसाठी निश्चित प्रेरणादायी आहे.

