गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त
Published on

ज्येष्ठ महिलेचे पावणेचार
लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

पुणे, ता. ७ : ज्येष्ठ महिलेचे पावणेचार लाख रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना एरंडवणे परिसरात डीपी रस्त्यावरील सिद्धी गार्डनसमोर घडली.

याबाबत एका ज्येष्ठ महिलेने (वय ६७, रा. नांदेड सिटी, सिंहगड रस्ता) अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला पतीसमवेत रविवारी (ता. ५) डीपी रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात विवाह समारंभासाठी निघाली होती. रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. त्यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके करीत आहेत.
-------

जमिनीच्या वादातून
तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
पुणे, ता. ७ : जमिनीच्या वादातून तरुणाला गजाने मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना मांजरी बुद्रूक परिसरात रविवारी घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत महेश रामदास घुले (वय ३६, रा. मांजरी बुद्रूक) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घुले यांचा त्यांच्या काही नातेवाइकांसमवेत वडिलोपार्जित जमिनीच्या मालकी हक्कावरुन वाद झाला होता. या वादातून रविवारी रात्री दहाच्या सुमारास आरोपींनी तक्रारदार घुले यांचा भाऊ अक्षय रामदास घुले (वय २८) याला गजाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अक्षय गंभीर जखमी झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश रोकडे करीत आहेत.
------

अतिक्रमणविरोधी पथकातील
कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की
पुणे, ता. ७ : बेकायदा पथारी व्यावसायिकांवर कारवाईदरम्यान अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी (ता. ६) सायंकाळी नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथ (फर्ग्युसन रस्ता) परिसरातील सागर आर्केड परिसरात कारवाई केली होती. त्या वेळी महिलेसह चौघांनी अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. याबाबत महापालिकेतील कर्मचारी सचिन मुक्तेश्वर घेंगे (वय २९, रा. मांजरी) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com