

पुणे, ता. २४ : जन सामान्य पक्षातर्फे नुकत्याच पार पडलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राज्य प्रवक्तेपदी निवृत्त शिक्षक मधुकर पाथरकर यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीची घोषणा पक्षाचे अध्यक्ष रामभाऊ वाघमारे यांनी केली. वाघमारे म्हणाले, ‘‘पाथरकर यांनी अनेक वर्षे शिक्षक म्हणून समाजातील सर्व स्थरांतील विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन नियुक्ती केली आहे.
भोसले यांना केंद्र सरकारच शैक्षणिक पुरस्कार
पुणे, ता. २४ : भारत सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, कौशल विकास व उद्यमशीलता मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिखर परिषद आयोजित केली होती. या परिषदेत अर्हम फाउंडेशनच्या अर्हम कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश भोसले यांचा ‘प्रिन्सिपल ऑफ द इयर अवॉर्ड फॉर इन्स्टिट्यूशनल एक्सलन्स २०२५’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी भारत सरकारच्या प्लस नाईन वन मीडियाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप गुलाटी उपस्थित होते. डॉ. भोसले यांनी उच्च शिक्षणात राबविलेल्या विविध विद्यार्थिकेंद्री उपक्रम, समाजाभिमुख कार्य आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून उच्च शिक्षणात राबविलेल्या उपक्रमांमुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.