डॉक्टरांनी ‘एआय’संबंधी ज्ञान आत्मसात करावे : डॉ. सी. पलानीवेलू
पुणे, ता. १४ : ‘भविष्यातील वैद्यकीय क्षेत्र आव्हानात्मक असेल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) मोठे बदल घडतील. रोबोटिक शस्त्रक्रियेच्या पुढे जाऊन डॉक्टरांनी ‘एआय’संबंधी ज्ञान आत्मसात करावे. भविष्यात सर्व शस्त्रक्रिया ‘एआय’च्या माध्यमातून होतील, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. डॉक्टरांनी त्यांच्या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व कौशल्य अवगत करून हा बदल स्वीकारावा व आपले कार्य करावे,’ असे मत डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार विजेते व फादर ऑफ लॅप्रोस्कोपी डॉ. सी. पलानीवेलू यांनी व्यक्त केले.
कोथरूड येथील सरस्वती कराड रुग्णालय व माईर्स एमआयटी एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव दाभाडे येथील डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘आंतरराष्ट्रीय थायरॉईड कॉन्क्लेव्ह’च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.