सिंहगड रस्त्यावर २८ सप्टेंबरला मॅरेथॉन
पुणे, ता. १५ : सरदार तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) पु. ल. देशपांडे उद्यानातील कलाग्रामजवळ रविवारी (ता. २८ सप्टेंबर) ‘पी. आर. साउथ एलएसओएम रन’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या मॅरेथॉनमध्ये ३, ५, १० आणि १५ किलोमीटर अशा चार गटांमध्ये धावण्याची संधी नागरिकांना मिळणार असून, १२ वर्षांवरील वयोगटातील धावपटू त्यात सहभागी होऊ शकतील. या मॅरेथॉनसाठी नाममात्र प्रवेश शुल्क असून त्यात नाश्ता, फिनिशर्स बॅज, झुंबा सेशन, मोफत प्रशिक्षण, वैद्यकीय सुविधा व डिजिटल छायाचित्रे यांचा समावेश आहे. नवरात्रीनिमित्त महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी सर्व ‘फ्लॅग-ऑफ’ महिला मान्यवरांच्या हस्ते होणार आहे, तसेच जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून अपंग धावपटूंना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. नोंदणीकृत सर्व धावपटूंना पुण्यातील विविध ठिकाणी मोफत ‘स्ट्रेंथ ट्रेनिंग’ची सुविधा असेल. नावनोंदणीसाठी www.lsom.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.