गेलेले आरक्षण आणल्यानंतर त्याला विरोध करणे अयोग्य बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
पुणे, ता. १७ : ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाम व न्याय्य भूमिका घेत आहेत. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात गेलेले आरक्षण पुन्हा आणले असून, त्याला अडथळा आणणे योग्य नाही, अशी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे व महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली.
पुण्यात विविध कार्यक्रमांनिमित्त बावनकुळे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त महसूल विभागातर्फे सेवा पंधरवड्याची सुरुवात केली असून, तो २ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. पाणंद रस्त्यांचे नूतनीकरण आणि क्रमांक देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या अभियानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार-खासदार सक्रियपणे सहभागी होत आहेत.’’
मुंबईत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. अशा दुष्कृत्यांना माफी दिली जाणार नाही, शासन कठोर कारवाई करेल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी आत्महत्येबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविल्याचेही त्यांनी सांगितले. पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबत ते म्हणाले, ‘‘विमानतळासाठी लागणाऱ्या एकूण जागेपैकी ७० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रक्रियाही सुरळीत पूर्ण होईल. पुण्यासाठी पुरंदर विमानतळ आवश्यक असून, यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी आम्ही दूर करू.’’
रोहित पवार हे केवळ प्रसिद्धी मिळावी म्हणून आरोप करत असतात. पवार कुटुंबाने समाजहितासाठी कधीही ठोस काम केले नाही. उलट सध्याचे सरकार विकासाचे काम पुढे नेत आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.