शिवसेना ठाकरे पक्षाचे
निषेध आंदोलन

शिवसेना ठाकरे पक्षाचे निषेध आंदोलन

Published on

पुणे, ता. १७ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. ‘एक पेढा भ्रष्टाचाराचा, एक पेढा मतचोरीचा,’ ‘एक पेढा खड्ड्यांचा, एक पेढा महागाईचा’ अशा घोषणा देत पक्षाने पेढे व गाजर वाटप करत नागरिकांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवारी कसबा गणपती मंदिरासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारकडून वारंवार घडणाऱ्या चुकीच्या घटना, नागरिकांच्या प्रश्‍नांकडे होणारे दुर्लक्ष व अन्य प्रश्‍नांबाबत सरकार दरबारी असणाऱ्या अनास्थेविरुद्ध आंदोलन करण्यात आले.
या वेळी शहरप्रमुख संजय मोरे, उपशहरप्रमुख गजानन थरकुडे, भरत कुंभारकर, प्रसिद्धिप्रमुख अनंत घरत, कार्यालयीन सचिव मकरंद पेटकर, संघटक राजेंद्र शिंदे, किशोर रजपूत, संदीप गायकवाड, मुकुंद चव्हाण, राजेश मोरे, चंदन साळुंखे, हेमंत यादव, नीलेश वाघमारे, नंदू येवले यांच्यासह महिला आघाडीच्या पद्मा सोरटे, निकिता मारटकर, स्वाती कथलकर, अमृता पठारे, सुनीता खंडाळकर आदी उपस्थित होते.
मोरे म्हणाले, ‘‘भाजप ही जुमला पार्टी बनली आहे. त्यांच्याकडून मतदारांची फसवणूक केली जात आहे. एकीकडे देशात महागाईने उच्चांक गाठला आहे, पुणेकर खड्ड्यांनी हैराण आहेत, असे असताना दुसरीकडे मतचोरी व भ्रष्टाचार वाढला आहे. ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ ही घोषणा फसवी ठरली आहे. नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदींनी सत्तेवरून पायउतार झाले पाहीजे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com