पुणे
अरुंधती फाउंडेशनतर्फे धर्मवीरांच्या स्मरणार्थ कार्यक्रम
पुणे, ता. १८ : सनातन धर्माच्या रक्षणासाठी प्राणार्पण केलेल्या धर्मवीरांचे स्मरण करणे, त्यांना सामूहिक तर्पण अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या त्यागाचा वारसा जपण्याची धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक जबाबदारी पार पाडणे या उद्देशाने अरुंधती फाउंडेशनतर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रविवारी (ता. २१) सकाळी १० ते दुपारी दोन या वेळेत नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे होणार आहे. या कार्यक्रमानंतर ‘हीज स्टोरी ऑफ इतिहास’ या चित्रपटाचे विनामूल्य प्रदर्शन होणार आहे. सर्व धर्मप्रेमी बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करावे, असे आवाहन अरुंधती फाउंडेशनचे आदित्य गुप्ते यांनी केले आहे.