‘नारीशक्ती’च्या हाती पुणे मेट्रो लाइन ३’ चे नियंत्रण
पुणे, ता. २० : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला नवी दिशा देणारी हिंजवडी ते शिवाजीनगर अशी ‘मेट्रो लाइन ३’ लवकरच सुरू होणार आहे. या मार्गावरील सर्व गाड्यांचे सारथ्य केवळ महिला पायलट करणार आहेत. ‘नारीशक्ती’च्या हातात नियंत्रण सोपवून पुणे मेट्रोने महिलांना पुढे आणण्याचा आणि सबलीकरणाचा नवा आदर्श घालून दिला आहे.
‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ने (पीआयटीसीएमआरएल) हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘केओलिस’ या आंतरराष्ट्रीय कंपनीला १० वर्षांचा संचालन करार देण्यात आला असून, याअंतर्गत मेट्रो चालविण्याची जबाबदारी १०० महिला पायलट्सकडे सोपवली जाणार आहे.
या उपक्रमामुळे सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरातील १०० तरुण महिलांना मेट्रो पायलट म्हणून निवडण्यात आले आहे. या महिलांना तीन महिन्यांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात २०० किलोमीटरचे पर्यवेक्षित रात्र-दिवस वाहन चालविण्याचे प्रशिक्षण समाविष्ट आहे. तांत्रिक प्रशिक्षणासोबतच त्यांच्या सुरक्षा, आरोग्य आणि दीर्घकाळ नोकरीत टिकून राहण्यावरही विशेष लक्ष दिले जात आहे.
या महिला पायलट्सनी प्रशिक्षणादरम्यान आपली क्षमता सिद्ध केली आहे. माण डेपो (स्टेशन क्र. १) ते बालेवाडी स्टेडियम (स्टेशन क्र. १०) यादरम्यान चार चाचणी फेऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती व्यवसाय केंद्राशी जोडणारी ‘पुणे मेट्रो लाइन ३’ ही लाखो प्रवाशांसाठी जीवनवाहिनी ठरणार आहे. याविषयी बोलताना ‘पीआयटीसीएमआरएल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी म्हणाले, ‘‘एकेकाळी पुरुषांसाठी राखीव मानल्या जाणाऱ्या क्षेत्रांत महिलांनीही पुढे यावे, यासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे. आमच्या महिला पायलट्स शिस्त आणि प्रगतीचे प्रतीक आहेत. त्या पुण्यासोबतच संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरत आहेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.