‘घोडके अँड सन्स पेढीचे शताब्दी वर्षात पदार्पण
पुणे, ता. २१ : सोन्या मारुती चौक, सराफ बाजार येथील पिंपळदास सीताराम घोडके अँड सन्स या सराफी पेढीला सोमवारी (ता. २२) ९९ वर्षे पूर्ण होऊन शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. १९२६ मध्ये दिवंगत पिंपळदास सीताराम घोडके यांनी घटस्थापनेच्या दिवशी या पेढीची स्थापना केली होती.
पिंपळदास यांनी सुरवातीला सोनार कारागिरांसाठी लागणाऱ्या ‘आवटया’ (साचा) तयार करण्याचा व्यवसाय चालू केला. त्यानंतर त्यांनी सराफी व्यवसायात प्रवेश केला. व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी जपत १९४५ ते १९५५ या कालावधीत विश्वकर्मा देशस्थ पांचाळ सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष व ट्रस्टी म्हणून काम केले. १९४२ साली ब्रिटिश सरकारने ‘वेस्ट एनग्रेव्हर’ म्हणून त्यांना मानपत्र प्रदान केले. त्याचकाळात त्यांनी ‘भारत छोडो’ आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. १९६५ व १९७१ साली दुकानाचे नूतनीकरण करून व्यवसाय वृद्धिंगत करण्यात आला. आज त्यांच्या पुढील पिढ्या हा वारसा समर्थपणे पुढे नेत असून पुणे आणि कोरेगाव (सातारा) येथे व्यवसाय विस्तारला आहे. शताब्दी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम ‘घोडके अँड सन्स’ पेढीतर्फे राबविण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.