दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ः कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ः कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे

Published on

पुणे, ता. २२ : ‘‘पावसामुळे झालेल्या पिकांच्या आणि जमिनीच्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे,’’ असे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सोमवारी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांचे या नैसर्गिक संकटामुळे होत असलेल्या नुकसानीकडे सरकार गांभीर्याने पाहत असून पंचनामे जलदगतीने सुरू आहेत,’’ असेही त्यांनी सांगितले.
पुण्यात द डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट असोसिएशन इंडियाच्या कार्यक्रमप्रसंगी भरणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतीसमोर निर्माण झालेल्या अडचणींवरही भाष्य करत भरणे म्हणाले, ‘‘राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे ६५ हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून हे प्रमाण सतत वाढत आहे. हवामान बदलामुळे सरासरी पावसाऐवजी एकाच दिवशी मुसळधार पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.’’
राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार आहे का, या प्रश्नावर भरणे म्हणाले, ‘‘ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत काही ठरावीक निकष आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील. राज्यभर पंचनामे जलदगतीने सुरू आहेत. मे ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या नुकसानीमध्ये शेतातील पिके, जमिनीचे नुकसान किंवा इतर हानी असो, सर्वांना सरकारकडून मदत मिळेल.’’

साखर उद्योग हा राज्यातील अत्यंत महत्त्वाचा उद्योग असून कारखाना मालक, अधिकारी व पदाधिकारी यांचा सक्रिय सहभाग उद्योगाच्या प्रगतीसाठी दिशादर्शक आहे. कारखान्यांमध्ये नव्या प्रयोगांची अंमलबजावणी होत असून, याचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
- दत्तात्रेय भरणे, कृषिमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com