राज्यात २६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
पुणे, ता. २२ ः राज्यात प्राथमिक अंदाजानुसार मुसळधार पावसाने २६ लाख तीन हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. पंधरा जिल्ह्यांमध्ये दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त शेती बाधित झाली आहे.
कृषी विभागाकडून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याने सध्या केवळ प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पंचनामे झाल्यानंतर बाधित क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील ३० जिल्ह्यांमधील शेती बाधित झाली आहे. दरम्यान, सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसल्याने सात लाख २८ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे; तर सर्वांत कमी नुकसान हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार हेक्टरवरील शेतीचे झाले आहे. मागील जवळपास दीड महिन्यापासून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये राज्यात झालेल्या पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह इतर पिकांमध्ये पाणीच साचल्याने पूर्ण पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
दृष्टिक्षेपात
एकूण बाधित जिल्हे - ३०
बाधित तालुके - १९५
महसूल मंडळे - ६५४
प्राथमिक अंदाज बाधित क्षेत्र - २६,०३,७६१ हेक्टर
बाधित पिके - सोयाबिन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद.
सर्वाधिक नुकसान झालेले पाच जिल्हे - नांदेड, बीड, सोलापूर, यवतमाळ आणि वाशीम.
महत्त्वाचे
- सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून, तिथे सात लाख २८ हजार ४९ हेक्टर पिके बाधित
- यवतमाळमधील तीन लाख ४२ हजार ५०९ हेक्टर, बीडमधील दोन लाख ९६ हजार ९५४ हेक्टर, वाशीम जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार ८१० हेक्टर, सोलापूरमधील तीन लाख ९२ हजार हेक्टर, धाराशिवमधील एक लाख ५७ हजार ६१० हेक्टर, बुलडाणामध्ये एक लाख ४८ हजार २९१, अहिल्यानगरमध्ये दोन लाख १४ हजार ९५७ हेक्टर, तर जालना जिल्ह्यात एक लाख एक हजार ६२८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.