‘इंटरनेटचा जबाबदारीने वापर ही काळाची गरज’

‘इंटरनेटचा जबाबदारीने वापर ही काळाची गरज’

Published on

पुणे, ता. २३ : ‘‘नागरिक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स, इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर वैयक्तिक माहिती सहज देतात. हीच माहिती चोरटे वापरून आर्थिक फसवणूक करतात. म्हणजेच आपणच आपली बँकेची किल्ली त्यांच्या हातात सोपवतो. मजबूत पासवर्ड, दोन-स्तरीय सुरक्षा तसेच इंटरनेटचा जबाबदारीने वापर ही काळाची गरज आहे,’’ अशी माहिती पोलिस निरीक्षक (सायबर क्राईम) स्नेहा अडसूळ यांनी दिली.
पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने ‘सायबर सुरक्षा सेमिनार २०२५ - डिजिटल जीवनाच्या सुरक्षित भविष्यासाठी’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यावेळी नागरिक व व्यापाऱ्यांसाठी दैनंदिन वापरात येणाऱ्या मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल व्यवहारांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. सायबर कायदा तज्ज्ञ अ‍ॅड. महारुद्र गीतेया उपस्थित होते.
अडसूळ म्हणाल्या, ‘‘आमच्या तपासात आतापर्यंत ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या जवळपास १ हजार प्रकरणांची नोंद झाली आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे. नागरिक मॉलमध्ये किंवा अन्यत्र जाऊन डिस्काउंट किंवा लॉटरीच्या नावाखाली चालणाऱ्या स्कॅम्समध्ये सहजपणे फसतात. तेथे तुमचे नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, ई-मेल आयडी अशी वैयक्तिक माहिती घेऊन ती पुढे विकली जाते किंवा चुकीच्या वापरात येते.’’ महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, प्रा. प्रमोद शाह, सुरेखा संधभोर, यशस्वी पटेल आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com