रेणुका स्वरूप प्रशालेत इनोव्हेशन लॅब सुरु
पुणे, ता. २५ : रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूलमध्ये ‘ग्लोबल लॉजिक’ने इंडिया एसटीईएम फाउंडेशनच्या सहकार्याने ‘रोबो शिक्षा केंद्र’ या नावाने पहिली विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयाची इनोव्हेशन लॅब सुरू केली आहे. औद्योगिक क्षेत्राची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) या अंतर्गत ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. इयत्ता सहावी ते नववीतील ७६३ विद्यार्थिनींना याद्वारे प्रगत तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळू शकणार आहे.
या प्रयोगशाळेद्वारे विद्यार्थिनींना रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), इलेक्ट्रॉनिक्स आणि कोडिंगसारख्या विषयांमध्ये शिकण्याची संधी मिळणार आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, इंडिया स्टेम एसटीईएम फाउंडेशनचे संस्थापक-संचालक सुधांशू शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.