फूड बिझनेस मालकांसाठी मोठी संधी
पुणे, ता. २५ : फूड इंडस्ट्रीतील नवीन ट्रेंड्स आणि व्यावसायिक संधी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी ठरणारी विनामूल्य कार्यशाळा २८ सप्टेंबरला सकाळी ११ ते ३ या वेळेत आयोजिली आहे. क्लाऊड किचन, रेस्टॉरंट, हॉटेल, स्नॅक्स सेंटर आणि कॅफे बिझनेस ओनरसाठी विशेष तयार केलेली ही कार्यशाळा फूड बिझनेसच्या भवितव्याला आकार देणारी ठरणार आहे. कार्यशाळेत फूड इंडस्ट्रीतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नव्या फूड ब्रँड्सचा लॉन्च आणि व्यावसायिक नेटवर्किंगच्या संधी आदींविषयी माहिती मिळणार आहे. कार्यशाळेत फूड इंडस्ट्रीतील तज्ज्ञांची मते, उद्योगातील नावीन्य आणि संधी यांविषयी विस्तृत आढावा घेण्यात येणार आहे. कार्यशाळेसाठी नोंदणी अनिवार्य आहे. व्यवसायाला एक नवी दिशा देण्यासाठी आणि इतर व्यावसायिकांशी जोडण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची व उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७२, ९१४६०३८०३१, ८४८४८११५४४, ९३७००६०८३९
ठिकाण : सुमंत मुळगावकर सभागृह क्रमांक १, ए-विंग, तळमजला, एमसीसीआयए ट्रेड टॉवर, सेनापती बापट रस्ता, पुणे
रिअल इस्टेट एजंटसाठी
डिजिटल मार्केटिंग
खास रिअल इस्टेट एजंटसाठी केंद्रित २० तासांची डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजिली आहे. रिअल इस्टेट एजंटना स्वतःच्या अथवा ते ज्या बांधकाम व्यवसाय कंपनीसाठी काम करतात त्यांच्या व्यवसायाची मार्केटिंग करायची असेल तर आजच्या काळात डिजिटल मार्केटिंगएवढे प्रभावी मार्केटिंग तंत्र उपलब्ध नाही. कोणत्याही कंपनीच्या किंवा संस्थेच्या प्रगतीत मार्केटिंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कंपनीचे उत्पादन विकण्यासाठी हे डिजिटल मार्केटिंगचे तंत्र कसे वापरावे तसेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, मोबाईल मार्केटिंग, डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग अशा विविध तंत्रांचा उपयोग डिजिटल मार्केटिंग कसे करावे याचे प्रगत मार्गदर्शन प्रात्यक्षिकासहित कार्यशाळेत होणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ४,९९९ अधिक जीएसटी.
संपर्क : ८४८४८२२८५५, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२
बांधकाम व्यवसाय पर्यवेक्षक प्रशिक्षण
स्थापत्य अभियांत्रिकीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली व्यक्तीही योग्य प्रशिक्षणानंतर बांधकाम उद्योगात आपला व्यवसाय सुरू करू शकते अथवा करिअर घडवू शकते. या पार्श्वभूमीवर ३० दिवसांचे प्रगत बांधकाम पर्यवेक्षक (कन्स्ट्रक्शन सुपरवायझर) प्रशिक्षण १ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. यामध्ये बांधकाम उद्योगात नोकरी मिळण्याची शक्यता वाढवणारे, स्थापत्य अभियांत्रिकीचे प्रगत ज्ञान देणारे, प्रात्यक्षिकावर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्राचा परिचय, बांधकाम साहित्याचा परिचय, रेखाचित्राचे वाचन व प्रत्यक्ष साइटवर त्याचा सराव, क्षेत्र भेटी, प्रकल्प पूर्वतयारी, कंत्राटदाराच्या कामाची पद्धत, अंदाज व खर्च नियोजन, बांधकाम उद्योगातील १४ महत्त्वाच्या पायऱ्या, सुरक्षिततेसाठी घ्यायची खबरदारी व वेळेचे व्यवस्थापन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९८८१०९९७५७
४० प्रकारचे चहा व व्यवसाय संधी
कुठल्याही ब्रँडचा आधार न घेता स्वतःच्या हिमतीवर चहा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ४० प्रकारच्या चहाचे प्रशिक्षण ४ व ५ ऑक्टोबरला आयोजिले आहे. यामध्ये चहाचे ४० प्रकार प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येतील तसेच मोठ्या प्रमाणात ऑर्डर घेऊन ऑनलाइन व्यावसायिक चहा विक्री कशी करायची?, चहा क्षेत्रात स्वतःचा ब्रँड कसा उभा करायचा?, चहाची विक्री कशी वाढवायची? याबाबत मार्गदर्शन होईल. या प्रशिक्षणानंतर थेट व्यवसाय उभे करण्याची व स्वतःच्या कॅफे, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी आस्थापनांची चहा विक्री वाढवण्याची संधी उपलब्ध होईल.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२