‘कासाळगंगा’ पुस्तकाचे लवकरच प्रकाशन
पुणे, ता. २६ : दुष्काळाविरुद्ध झुंजणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील जनतेने एकत्रित येत लोकसहभागातून जलविकास साधला. त्यातून ‘क्लष्टर’ विकास झाला आहे. त्याचा अभ्यास डॉ. सोमनाथ घोळवे यांनी केला असून, त्यांचे ‘कासाळगंगा : कहाणी लोकसहभागातून जलविकासाची’ या पुस्तकाचे प्रकाशन पुढील आठवड्यात पुण्यात होणार आहे.
‘द युनिक फाउंडेशन’तर्फे हे पुस्तक प्रकाशित होत आहे. पाण्याअभावी जगण्यासाठी स्थलांतराचा प्रश्न भेडसावतो. इथंही तेच घडले पण पाणी उपलब्ध झाल्यावर येथे ‘रिव्हर्स मायग्रेशन’ झाले आहे. पाणी साठवणे, मुरवणे म्हणजे जलसंधारण नव्हे, तर पूर नियंत्रण करता येते, हे ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. शिवाय बदलत्या वातावरणामध्ये शेतीला संजीवनी मिळाल्याचे डॉ. घोळवे यांना अभ्यासावेळी अनुभवायला मिळाले. कासाळगंगा हा अखेरची घटका मोजत असलेला ओढा लोकसहभागातून पुनर्जीवित झाला. ग्रामस्थांनी कासाळगंगाला नदीचे स्वरूप प्राप्त करून चंद्रभागा नदीची उपनदी बनवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.