कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे
शासकीय अभियंत्यांचा गौरव

कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे शासकीय अभियंत्यांचा गौरव

Published on

पुणे, ता. २७ : ‘चांगल्या अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक व्हावे, त्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळावी,’ या हेतूने अभियंता दिनानिमित्त पुणे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने विविध शासकीय विभागातील अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अविनाश सुर्वे, बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव सदाशिव साळुंखे यांच्यासह अधीक्षक अभियंता संजयकुमार माळी, कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार काटकर, उज्ज्वला घावटे, संघटनेचे अध्यक्ष रवींद्र भोसले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात अधीक्षक अभियंता मैथिली झांजुर्णे, कार्यकारी अभियंता शैलजा पाटील, उपअभियंता दत्तात्रेय कोकणे, कोमल घोगरे, सूर्यकांत कुंभार, शाखा अभियंता गणेश टेपाळे, योगेश मेटेकर, विजय शिंदे, विशाल पाटील यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Marathi News Esakal
www.esakal.com