डॉ. हेमा साने यांच्याकडून
वनस्पतीशास्त्राला प्राणवायू
श्रद्धांजली सभेत मान्यवरांची भावना

डॉ. हेमा साने यांच्याकडून वनस्पतीशास्त्राला प्राणवायू श्रद्धांजली सभेत मान्यवरांची भावना

Published on

पुणे, ता. २७ : ‘डॉ. हेमा साने यांनी प्राध्यापिका म्हणून वनस्पतीशास्त्राला प्राणवायू दिला. तसेच वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासात अनेक पारंगत पिढ्या घडविल्या,’ अशा शब्दांत ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
डॉ. साने यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीच्या सभेत विनया घाटे म्हणाल्या, ‘‘डॉ. साने निसर्गसेवक संस्थेच्या मार्गदर्शक होत्या आणि त्यांनी संस्थेच्या अंकामध्ये अनेक वेळा मोलाचे योगदान दिले. डॉ. साने यांचे योगदान केवळ वनस्पतिशास्त्रातच नव्हे, तर पर्यावरणीय संवर्धन आणि निसर्ग संरक्षणातील त्यांचे कार्यही मोठे आहे.
‘‘आम्ही विद्यार्थीदशेत असताना, त्यांनी आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यांचे योगदान वनस्पतिशास्त्राच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे आहे, पण त्याबद्दल कधीच जास्त चर्चा झाली नाही. त्यांचा संपूर्ण कार्यकाल एक पिढी घडवण्यासाठी समर्पित होता.,’’ असे मत डॉ. मुकुंद देशपांडे यांनी व्यक्त केले.
मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक गो. ब. देगलूरकर यांनी पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे की, ‘डॉ. साने यांनी ‘कमळ’ या विषयावर लिहिलेली पुस्तिका वनस्पतिशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्र यांचा एक सुंदर संगम आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या विधानालाही अतिशयोक्ती वाटावी, इतकी साधी राहणी त्यांनी अंगीकारली होती. त्यांचे ‘मी पण’ गळून पडले होते, यावरून त्यांना जीवनातील सत्य कळले होते.’’

यावेळी किशोरी आपटे, डॉ. मिलिंद सरदेसाई, आणि डॉ. अनुराधा उपाध्ये यांनीही मनोगते व्यक्त केली. त्यांनी डॉ. साने यांचा आदर्श, त्यांचे कार्य, आणि त्यांची अतूट निसर्गप्रेमी भूमिका यावर त्यांनी विचार व्यक्त केले.
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com