‘सकाळ रिलिफ फंड’कडे मदतीचा ओघ सुरूच

‘सकाळ रिलिफ फंड’कडे मदतीचा ओघ सुरूच

Published on

पुणे, ता. २८ : जुनी सांगवी परिसरातील श्री अय्यप्पा स्वामी सेवा परिषद, अय्यप्पा मंदिर समिती व पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या केरळी समाज बांधवांकडून पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंड’कडे एक लाख ५१ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ आणि कम्युनिटी डेव्हलपमेंटचे सरव्यवस्थापक प्रदीप वेदपाठक यांच्याकडे सुपूर्त केला.
यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष जे. राधाकृष्णन नायर, के. सी. पोन्नूकुटण, शशीधरन नायर, सुरेश नायर, सुधीर नायर, के. पी. टी. पिल्ले, राधाकृष्णन नंबियार, जे. पी. पिल्ले, टि. के. रविकुमार, तनिष्का व्यासपीठाचे विभागप्रमुख सागर गिरमे, जिल्हाप्रमुख रमेश मोरे, तनिष्का गटप्रमुख तृप्ती कांबळे आणि तनिष्का सदस्य उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरात मागील ५० वर्षांपासून नोकरी आणि व्यवसायामुळे विविध राज्य व प्रांतांतून मोठ्या संख्येने केरळी समाज बांधवांचे वास्तव्य आहे. जुनी सांगवी, पिंपळे गुरव आणि नवी सांगवी या उपनगरातून केरळी समाज बांधव विविध सामाजिक उपक्रमांत सहभागी होतात. जुनी सांगवी येथील जयमालानगर येथे श्री स्वामी अय्यपा मंदिर आहे. मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांसह विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरसह राज्यातील प्रभावित जिल्ह्यांतील पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंड’कडे राज्यभरातून दानशूर व्यक्ती सढळ हातांनी मदत करत असून, चौथ्या दिवशीही मदतीचा ओघ सुरू आहे. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा ‘सकाळ रिलीफ फंड’ने कायम ठेवत राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समाजाला मदतीचे आवाहन करण्यात आले होते. ‘सकाळ रिलीफ फंड’च्या आवाहनाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

...यांनी केली सढळ हस्ते मदत
व्यक्ती - संस्था यांनी केलेली मदत (रुपयांमध्ये)
डॉ. स्वामिनाथ गोपालघारे यांनी ३१ हजार रुपयांची मदत केली. महेश गुधाटे यांनी २१ हजार रुपयांची मदत केली. ज्ञानेश डेंगळे यांनी २० हजार रुपयांची मदत केली.
अकरा हजार रुपयांची मदत : विनायक इनामदार, डॉ. रश्मी पाचघरे व सुभाष टेकावडे.
दहा हजार रुपयांची मदत : मेघन जोगळेकर, डॉ. स्वाती टिकेकर, पुरुषोत्तम पुराणिक, संपत पानसरे, स्वरांजली लोकरे व अमित दाभोळकर यांनी मदत केली, तर संगीता घरत यांनी १० हजार पाचशे रुपयांची मदत केली.
पाच हजार रुपयांची मदत : सुनील डुणुंग, भारमा गवी, किशोर फरांदे, सिद्राम रोकडे, अद्वैत इनामदार, अनुज पिंगळे, डॉ. रवींद्र उनकुळे, नितीन जाधव, रत्नाकर शिरोळकर, शिवाजी पठारे, श्रीकांत ठाकूरदेसाई, सुधीर भानुशाली, शैलजा हांडे, सुनील पानसे, अभिजित देशमुख, सुरेखा गिलबिले, नीलेश शिंदे, सॅलव्हिन जोशुआ, उदय पुजारी, मिलिंद राऊत, अनघा साळुंखे, राधाकृष्ण कालकुंद्रे, नितीन पटेल, गौरी वागळे, रामकिशन शिंदे व प्रभाकर ठुसे यांनी मदत केली. याशिवाय शैलेंद्र करंजावणे, मनोज हिंगे व दया वाडेकर यांनी अनुक्रमे पाच हजार शंभर, सात हजार, चार हजार आणि तीन हजार रुपयांची मदत केली.
दोन हजार पाचशे रुपयांची मदत : सागर चोपदार, नितीन शेडगे, महेंद्र वालके, अमित यमगेकर, अविनाश खाडे, विजय डांगे, सुशीला व्हटकर व विजय व्हटकर यांनी मदत केली, तर प्रदीप कुमरे व संतोष कुतवळ यांनी प्रत्येकी दोन हजार शंभर रुपयांची मदत केली.
दोन हजार रुपयांची मदत : सरिता गावडे, किशोर थोरात, चित्तरंजन देव, अभिजित पाचर्णे, सुरेश जालिहाळ, सागर यनपुरे, उल्हास जगताप, ज्ञानेश्‍वर गोगावले, प्रकाश दाभाडे, मुकेश पाटील, कल्पना कणकेकर, अरविंद अभंगे, राजेंद्र जगताप व मीनाक्षी वाडेकर यांनी मदत केली, तर मनोहर साटम, सचिन सुर्वे, ओंकार किर्वे, संदीप समर्थ, रेणुका वाघमारे व शेपिया सुखवानी यांनी प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत केली.
एक हजार रुपयांची मदत : विनायक मुळ्ये, दीपाली ऊर्जा, संतोष पडिले, सुनील झाडबुके, समीर घोलकर, शिवा मोहिते, अजिंक्य पाटील, गुरुदत्त इनामदार, शंकर नेर्ले, मंगला बोरा, आरती गलांडे, रामचंद्र भोसले, तानाजी खोरटे, जयवंत माझिरे, विजय बामणे, राघवेंद्र पुरोहित, दीपक पंडित व कचरदास उदावंत यांनी मदत केली. तर धनंजय चित्रूक, रिटा महाजन व संदीप ठाकूर यांनी एक हजार शंभर रुपयांची मदत केली. याशिवाय डॉ. मधुकर खेतमाळस व भुजंग शेळके यांनी एक हजार एकशे अकरा रुपयांची मदत केली.
पाचशे रुपयांची मदत : मयंक शहा, शशांक अगरखेड, नीलेश वराडे, प्रकाश कुंटेवार, सुशांता कवठणकर, बाळासाहेब भोकनळ व सदाशिव चव्हाण यांनी मदत केली, तर निरंजन सातव यांनी सातशे रुपयांची मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com