‘सकाळ’तर्फे केतकी माटेगावकर लाइव्ह

‘सकाळ’तर्फे केतकी माटेगावकर लाइव्ह

Published on

पुणे, ता. ३० : नव्या पिढीतील आश्वासक युवा गायिका केतकी माटेगावकर यांच्या सुरांची पर्वणी संगीतप्रेमींना मिळणार आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘केतकी माटेगावकर लाइव्ह’ या नव्या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (ता. ३ ऑक्टोबर) ही विशेष संगीत मैफील रंगणार आहे. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या तिकीटविक्रीला सुरुवात झाली आहे.
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पुणेकर रसिकांसाठी नेहमीच दर्जेदार सांस्कृतिक-सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सोनू निगम, श्रेया घोषाल, जावेद अली, नीलाद्री कुमार, अन्नू कपूर, स्वानंद किरकिरे, राहुल देशपांडे, उषा उत्थुप, पापोन अशा दिग्गज कलाकारांच्या मैफली ‘सकाळ’ने आयोजित केल्या आहेत. याच मालिकेतील हा पुढचा कार्यक्रम आहे. ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’ हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक, तर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड हे सहयोगी प्रायोजक आहेत.
या कार्यक्रमात केतकी माटेगावकर हिची दर्जेदार गाणी रसिकांना ऐकायला मिळतील. केतकीच्या स्वतःच्या गीतांसह गाजलेली मराठी-हिंदी चित्रपटगीते, भावगीते, नाट्यगीते, अभंग, भक्तिगीते अशा वैविध्यपूर्ण गाण्यांची पर्वणी या कार्यक्रमात असेल. आजवर रूढ असलेल्या संगीत मैफलींच्या स्वरूपापेक्षा या कार्यक्रमाचे स्वरूप वेगळे असून प्रेक्षकांना सहभागी करून घेत, त्यांच्याशी संवाद साधत ही मैफील पुढे जाणार आहे. गीतांच्या दर्जेदार सादरीकरणासह एक दर्जेदार दृश्यात्मक अनुभव या कार्यक्रमातून रसिकांना मिळणार आहे. केतकीचा आजवरचा संगीतप्रवासही यातून उलगडणार असून काही नृत्यरचनांचाही कार्यक्रमात समावेश असेल.

तिकिटे आरक्षित करा
या कार्यक्रमाची तिकिटे आरक्षित करण्यासाठी bookmyshow. com आणि ticketalay.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ९६०२०२७६७६ या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन ‘सकाळ माध्यम समूहा’ने केले आहे. तसेच या कार्यक्रमाची तिकिटे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ९ ते ११.३० आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ दरम्यान उपलब्ध आहेत.

‘लोकमान्य’च्या सभासदांसाठी सवलतीत प्रवेशिका
या कार्यक्रमाच्या सशुल्क प्रवेशिका ‘लोकमान्य’च्या सभासदांसाठी सवलतीत उपलब्ध करून देणार आहेत. त्या घेण्यासाठी ९०२२१७३५९७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

‘सकाळ’तर्फे आयोजित केतकी माटेगावकर लाइव्ह या संगीत मैफलीचे सहयोगी प्रायोजक होण्याचा ‘लोकमान्य’ला आनंद आहे. नव्या पिढीतील सुरेल आवाज रसिकांना नक्कीच मंत्रमुग्ध करेल, असा विश्वास आहे. सांस्कृतिक आणि दर्जेदार उपक्रमांना पाठबळ देणे ही ‘लोकमान्य’ची परंपरा असून या सोहळ्यातून रसिकांना खास अनुभव मिळेल.
- सुशील जाधव,
विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड

पारंपरिक मूल्ये आणि नवनवीनतेचा संगम जपणारा ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’ला ‘सकाळ’तर्फे आयोजित केतकी माटेगावकर लाइव्ह या सुरेल सोहळ्याचे सहयोगी प्रायोजक होण्याचा आनंद आहे. संगीत आणि संस्कृतीच्या माध्यमातून समाजाशी नाते जोडणे ही आमची जपलेली परंपरा असून हा कार्यक्रम रसिकांसाठी आनंददायी ठरेल.
- अमित मोडक,
संचालक, पु. ना. गाडगीळ अँड सन्स लिमिटेड

हे लक्षात ठेवा
- कधी : शुक्रवारी (३ ऑक्टोबर)
- केव्हा : रात्री नऊ वाजता
- कुठे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com