‘रूपान्तरम्’ प्रदर्शन बारा आॅक्टोंबरपर्यंत
पुणे, ता. १ ः ‘रूपान्तरम् - एक रूपातून दुसऱ्या रूपाकडे’ हे नैसर्गिक पाना-फुलांचे कापडावर रंगबिरंगी ठसे उमटविलेल्या निवडक कलाकृतींचे प्रदर्शन औंध येथील स्टुडिओ कॅलिडो येथे तीन ते बारा ऑक्टोबर दरम्यान सकाळी ११ ते १ आणि दुपारी ३ ते ७ या वेळेत होईल.
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. यात ‘इको प्रिंटिंग’ या क्षेत्रात गेली आठ वर्ष कार्यरत श्रद्धा जोशी बर्डे यांनी, वातावरणातील प्रदूषण, त्यातून माणसावर, जीवसृष्टीवर होणारे परिणाम, जंगलतोड या सर्व गोष्टींचा परामर्श एका मांडणी चित्राद्वारे (इंस्टॉलेशन) दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रदर्शनात माणसाने पर्यावरणावर केलेला आघातसुद्धा निसर्ग निमूटपणे सहन करतो पण त्याचे परिणाम मात्र सर्वच जीवसृष्टीला भोगावे लागतात, याचे चित्रण केले आहे. तसेच निसर्गातील पाना-फुलांचे आकार जेव्हा कापडावर नैसर्गिकरीत्या उमटतात, त्या रंगसंगतीने प्रोत्साहन घेऊन काही चित्र रंगविण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रदर्शनाचा पुणेकरांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
-------------
फोटोः 56546