प्राणी अत्याचाराविरुद्ध आज मोर्चाचे आयोजन

प्राणी अत्याचाराविरुद्ध आज मोर्चाचे आयोजन

Published on

पुणे, ता. १ : विविध उद्योगांतील व्यवसायातून वासरू, बोकड, कोंबडी, मासे आदी प्राण्यांचे शोषण व त्‍यांची हत्‍या थांबविणे त्‍यांच्‍यावरील अमानुष वागणूक आदी विषयांशी प्राण्यांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
पुणे ॲनिमल लिबरेशन आणि व्हेगन इंडिया मूव्हमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा गुरुवारी (ता. २) दुपारी दोन वाजता नामदार गोपाळकृष्‍ण गोखले रस्‍त्‍यावरील कलाकार कट्टा येथून निघणार आहे. या वेळी विविध प्राण्यांची वेशभूषा करून कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार आहेत, अशी माहिती सहसंयोजक अमजोर चंद्रन आणि सई मानकांत यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्राणी हे संवेदनशील जीव असून ते माणसाप्रमाणेच वेदना, दुःख, आनंद अनुभवू शकतात. त्‍यांची हत्‍या करणे हे क्रौर्य असून आपण त्‍यांच्‍याकडे संसाधन म्‍हणून पाहण्‍याऐवजी संवेदनशील जीव म्‍हणून पाहावे, असे आवाहन त्‍यांनी केले.

Marathi News Esakal
www.esakal.com