पासपोर्ट कार्यालयातर्फे ‘ओपन हाऊस’ उपक्रम
पुणे, ता. १ ः प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (आरपीओ), पुणे यांच्यातर्फे पासपोर्ट सेवांबाबतच्या तक्रारी व सूचनांसाठी संवाद साधण्याच्या उद्देशाने ‘ओपन हाऊस’ उपक्रम मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्रात राबविण्यात आला. पासपोर्ट कार्यालयातर्फे नागरिकांना थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधून आपली मते मांडण्याची संधी यावेळी देण्यात आली.
या सत्रात पासपोर्ट कार्यालयात उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांना, मांडलेल्या तक्रारींचे वेळेत निवारण करण्याचे आश्वासन दिले तसेच पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख सेवा देण्याच्या अधोरेखित केले. पासपोर्ट कार्यालयातर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी असे सत्र नियमितपणे आयोजित केले जाते. पुढील ‘ओपन हाऊस’ उपक्रम हा १२ नोव्हेंबरला दुपारी तीन ते पाच या वेळेत बाणेर-पाषाण लिंक रस्ता येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात होणार आहे. पासपोर्टसंदर्भात अडचणी असलेल्या नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपस्थितीसाठी आगाऊ नोंदणी आवश्यक असून, rpo.pune@mea.gov.in या मेलवर अर्ज केल्यानंतर मिळालेल्या पुष्टी मेलद्वारेच प्रवेश दिला जाणार आहे.
------------------
फोटोः 56718