पुणे
शहरामध्ये दोन दिवस ढगाळ वातावरण
पुणे, ता. १ : शहरामध्ये बुधवारी कमाल तापमानात वाढ नोंदविली गेली. पावसाने उघडीप दिल्याने शहरात वाढलेल्या तापमानामध्ये सर्वाधिक नोंद ही दापोडीमध्ये ३३ अंश सेल्सिअस एवढी झाली. पुढील दोन दिवस शहरामध्ये ढगाळ वातावरण, तर अति हलक्या ते हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
पुण्यात दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात किंचित वाढ झाली आहे. शिवाजीनगर भागात २८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तळेगाव ३२ अंश सेल्सिअस, मगरपट्टा भागात ३१.१ अंश सेल्सिअस, चिंचवड २९.५ अंश सेल्सिअस, वडगाव शेरी २९.२ अंश सेल्सिअस, पाषाणमध्ये २८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.