विविध उपक्रमांनी ‘बीएसएनएल’चा वर्धापन दिन साजरा
पुणे, ता. १ : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘पीजीएम’ कार्यालय येथे विविध उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ‘बीएसएनएल’ एम्प्लॉईज युनियन महाराष्ट्राचे अध्यक्ष नागेश कुमार नलावडे, प्रधान महाप्रबंधक श्यामवेल भातांब्रे, सर्व महाप्रबंधक तसेच सर्व युनियन व असोसिएशन यांचे सचिव व अध्यक्ष आणि आजी-माजी कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर २५ वर्षांची यशस्वी वाटचाल साजरी करत केक कापण्यात आला. यानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत ‘बीएसएनएल’ महिला संघटनेच्या वतीने ‘आपलं घर’ या अनाथाश्रमाला अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. भातांब्रे व अन्य अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. ‘बीएसएनएल’ कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्यासाठी हेल्थ कॅम्पचे आयोजन केले होते. बाजीराव रस्ता येथे बाजीराव मित्रपरिवाराच्या वतीने गाणी व पथनाट्य सादर करून जनतेशी संवाद साधण्यात आला.