जिवंत होणार संगीत रंगभूमीचा इतिहास

जिवंत होणार संगीत रंगभूमीचा इतिहास

Published on

पुणे, ता. ३ ः ‘सीता स्वयंवर’ या १८४३मध्ये सादर झालेल्या नाटकापासून ते अगदी आजच्या ‘संगीत देवबाभळी’पर्यंत... मराठी रंगभूमीला संगीत नाटकांची समृद्ध आणि वैभवशाली परंपरा लाभली आहे. ‘नाट्यसंगीताची वाटचाल’ या विशेष कार्यक्रमातून ही परंपरा रसिकांसमोर पुन्हा एकदा जिवंत होणार आहे.
निमित्त आहे, सकाळ माध्यम समूहातर्फे दिवाळी पूर्वसंध्येला आयोजित विशेष कार्यक्रमाचे. निपुण धर्माधिकारी लिखित-दिग्दर्शित हा अभिनव प्रयोग प्रसिद्ध गायक-अभिनेते राहुल देशपांडे, गायिका प्रियांका बर्वे आणि अभिनेते अमेय वाघ हे कलाकार सादर करणार आहेत. २० ऑक्टोबरला सायंकाळी ६.३० वाजता कर्वेनगरच्या डीपी रस्त्यावरील पंडित फार्म येथे हा कार्यक्रम सादर होणार आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि., क्रेझी चीजी कॅफे, देशपांडे रिअल्टी-प्रसाद देशपांडे व्हेन्चर आणि चार्वी हे या कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक आहेत.
या कार्यक्रमानिमित्त कलाकारांनी सकाळ कार्यालयाला भेट देत संवाद साधला. याप्रसंगी ‘लोकमान्य मल्टीर्पपज को-ऑप. सोसायटी लि.’चे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, ‘देशपांडे रिअल्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद देशपांडे, तांत्रिक विक्री व वितरण विभागाचे संचालक अभिषेक देशपांडे, विक्री व वितरण विभागाच्या संचालक शिल्पा भराडे आदी उपस्थित होते.
धर्माधिकारी म्हणाले, ‘‘मराठी संगीत नाटक हे आपल्या नाट्यसृष्टीचा आणि चित्रपटसृष्टीचा पाया आहे. आजच्या पिढीला मात्र संगीत नाटकांविषयी फारशी माहिती नाही. त्यांना रंजक पद्धतीने या परंपरेची ओळख करून देणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. निवडक संगीत नाटकांमधील काही भाग आणि काही नाट्यगीतांचा समावेश या कार्यक्रमात असेल.’’

हे लक्षात ठेवा
कार्यक्रमाची तिकिटे bookmyshow.com व ticketkhidakee.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच, या कार्यक्रमाच्या सशुल्क प्रवेशिका ‘लोकमान्य सोसायटी’च्या सभासदांसाठी सवलतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सशुल्क प्रवेशिका घेण्यासाठी ९०२२१७३५९७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

‘कट्यार काळजात घुसली’ आणि ‘मी वसंतराव’सारखे चित्रपट तरुण पिढीलाही प्रचंड आवडले. या कार्यक्रमातील काही गाणीही या पिढीला समोर ठेवून संगीतबद्ध करण्यात आली आहेत. ती त्यांना नक्कीच आवडतील, असा माझा विश्वास आहे.
- राहुल देशपांडे, गायक-अभिनेते

संगीत नाटक सादर करणे, हे नेहमीच आव्हानात्मक असते. गायन आणि अभिनय, अशा दोन्ही परीक्षा एकाच वेळी असतात. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवीन नाट्यगीते हाताळायला मिळत आहेत, याचा आनंद आहे.
- प्रियांका बर्वे, गायिका

या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांनी आजवर एकही संगीत नाटक पाहिले नसेल, तरी त्यांना या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेता येईल आणि या परंपरेची ओळख होईल. अतिशय रंजक स्वरूपात या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे.
- अमेय वाघ, अभिनेते

परदेशातही होणार प्रयोग
‘नाट्यसंगीताची वाटचाल’ या कार्यक्रमाचे प्रयोग परदेशातही करण्याचा मानस कलाकारांनी व्यक्त केला. पुढील वर्षी एप्रिल आणि मे या काळात अमेरिकेत या कार्यक्रमाचे प्रयोग सादर होणार आहेत. तसेच, युरोप, दुबई आणि ऑस्ट्रेलिया येथेही त्यानंतरच्या काळात या कार्यक्रमाचे प्रयोग सादर होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com