आज पुण्यात ४ ऑक्टो. २०२५ शनिवार

आज पुण्यात ४ ऑक्टो. २०२५ शनिवार

Published on

आज पुण्यात ४ ऑक्टो. २०२५ शनिवार
...................... .........................
सकाळी ः
व्याख्यान ः मराठा सेवा संघ व संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद व पुणे महानगरपालिका आयोजित ः केशवराव भोसले यांच्या १०४ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या संगीत व नाट्य कारकिर्दीला उजाळा देण्यासाठी व्याख्यान ‘नमन संगीतसूर्याला’ ः व्याख्याते- संजय गोसावी ः अध्यक्षा- वर्षा धाबे ः उद्‍घाटक- सुनील बल्लाळ ः पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर ः १०.००
पुस्तक प्रकाशन ः दिलीपराज प्रकाशनतर्फे ः वैभव केळकर व डॉ. मेघना दलाल लिखित ‘पार्थसूत्र’ आणि ‘बो ॲण्ड बियाँड’ या पुस्तकांचे प्रकाशन ः उपस्थिती- विनय सहस्रबुद्धे, डॉ. मेधा कुलकर्णी ः भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कर्वेनगर ः ११.००.
सन्मान सोहळा ः जयमाला काळे-इनामदार यांच्या अभिनय-नृत्य कारकिर्दीला ६५ वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ सन्मान सोहळा ः हस्ते- डॉ. सदानंद मोरे ः उपस्थिती- डॉ. किशोर सरपोतदार ः ‌‘लावण्य‌’ या विषयावर लावण्यांचे कविसंमेलन ः पत्रकार भवन, नवी पेठ ः ११.००.
दुपारी ः
पुणे मराठी ग्रंथालय आणि ग्रंथसखा वाचनालय आयोजित ः ‘पॅपिलॉन’ या अनुवादित पुस्तकाचा सुवर्णमहोत्सव ः ‘पॅपिलॉन’चे रवींद्र गुर्जर यांचा सत्कार ः अध्यक्ष- धनंजय बर्वे ः उपस्थिती- दिलीप माजगावकर ः पुणे मराठी ग्रंथालयाचे केशव सभागृह, नारायण पेठ ः ३.३०.
सायंकाळी ः
संगीत महोत्सव ः एसएनबीपी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि एस. ई. सोसायटीतर्फे ः स्वरयज्ञ संगीत महोत्सव ः पंडित हरिप्रसाद चौरसिया (बासरीवादन) विदुषी मधुश्री नारायण (गायन), सत्यजित तळवलकर (एकल तबलावादन) विदुषी सानिया पाटणकर (गायन) ः साथसंगत- संतोष घंटे, माधव लिमये, विनायक गुरव, अभिषेक शिनकर ः नाट्यविधा परफॉर्मिंग आर्ट सेंटरच्या विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार ः एस.एन.बी.पी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सरस्वती हॉल, येरवडा ः ५.००.
सांगीतिक कार्यक्रम ः राजेश व्यास ग्रुपतर्फे ः डॉ. आनंद नाडकर्णी यांचा ‘फिल्मी नग़मे आणि तुमचा ईक्यू’ हा आगळावेगळा कार्यक्रम ः यशंवतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड ः ५.००.
वर्धापन दिन व पुरस्कार वितरण ः शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ आयोजित ः याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा)चा १८ वा वर्धापन दिन ः युवा कलाकार पुरस्कार (मुक्ता बर्वे), युवा उद्योजक पुरस्कार (प्रसाद कुलकर्णी)ः हस्ते- डॉ. विनय सहस्रबुद्धे ः उपस्थिती- डॉ. मेधा कुलकर्णी ः टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता ः ५.३०.
पुस्तक प्रकाशन ः डॉ. विनोद बिडवाईक लिखित ‘द एक्झिक्युटिव्ह ट्रॅप’ या पुस्तकाचे प्रकाशन ः प्रमुख पाहुणे- डॉ. संतोष भावे, उदय जाधव ः क्रॉसवर्ड बुकाथॉन, वेस्टएंड मॉल, औंध ः ५.३०.
प्रकाशन समारंभ ः आर्यबाग सांस्कृतिक परिवार आयोजित ः ‘आर्यबाग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन ः डॉ. नंदू मुलमुले आणि ओंकार जाधव यांच्या ‘वेड’ विषयावर गप्पा ः भांडार संस्थेचा नवमल फिरोदिया हॉल, लॉ कॉलेज रस्ता ः ५.३०.
व्याख्यान ः देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था आयोजित ः वैदिक आणि शारदीय व्याख्यानमाला ः विषय- बीज मंत्र ः वक्ते- प्रणव गोखले ः एकनाथ मंगल कार्यालय, ५२४ बुधवार पेठ, जुनी तपकीर गल्ली ः ६.००.
व्याख्यान ः केळकर्स हेल्थ सोल्युशन्सतर्फे ः विषय- खादी विचार आणि निसर्गोपचार (सरकी ते कापड याचे प्रात्यक्षिक) ः वक्ते- रुबी रमा प्रवीण ः केळकर्स हेल्थ सोल्युशन्स, १४२८, सदाशिव पेठ, पुणे विद्यार्थी गृहाजवळ ः ६.००.
सांगीतिक कार्यक्रम ः आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे ः ‘अमृत वर्षा’ रात्रीच्या व उत्तर रात्रीच्या रागांची सांगीतिक मैफल ः सादरकर्ते- नागेश आडगावकर, रागेश्री वैरागकर, मीनल दातार, आदित्य मोडक, धनश्री घैसास, केदार केळकर, अंकिता जोशी, मेहेर परळीकर, आदित्य खांडवे ः पं. संगीत मिश्रा (सारंगी), अनुप कुलथे (व्हायोलिनवादन) ः भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ ः ६.००.
उद्‍घाटन ः युवामैत्री हेल्पलाइनचे उद्‍घाटन ः व्ही. के. राजवाडे सभागृह. भारत नाट्य मंदिराजवळ, भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ ः ६.००.
संगीत मैफील ः संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे ख्यातनाम सतारवादक उस्ताद विलायत खान साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त ः संदीप आपटे यांचे सतारवादन ः एम. ई. एस. सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड ः ६.००.
संगीत मैफील ः अल्फा इव्हेंट्‍स‍तर्फे ः सायंकालीन रागांची मैफील- स्वरार्चना ः अपर्णा पणशीकर व स्मिता देशपांडे यांचे गायन ः साथसंगत- लीलाधर चक्रदेव (संवादिनी), संजय देशपांडे ः सेवा भवन, सी.डी.एस.एस. चौक, एरंडवणे ः ६.००.
प्रकाशन ः पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे ः पुष्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन ः हस्ते- चंद्रकांत पाटील व विश्वास पाटील ः सिटी प्राईड, कोथरूड ः ६.३०.
प्रवचन ः भारतीय बौद्ध महासभा आयोजित ः वर्षावास प्रवचनमाला ः विषय- धम्मलिपीचा शोधकर्ता ः प्रवचनकार- प्रकाश नाईक ः सम्राट अशोक बुद्ध विहार, संविधान चौक, वानवडी ः ७.००.
.............. .................. .................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com