स्वयंपुनर्विकासात सभासदांचा सहभाग महत्त्वाचा
पुणे, ता. ५ : शहरात पुनर्विकासाची कामे झपाट्याने होत आहेत. अपार्टमेंट, बंगले, सोसायट्यांचा स्वयंपुनर्विकास करण्याच्या निर्णयापासून सदनिकेचा ताबा मिळेपर्यंत प्रकल्पातील सभासद आणि विकसक यांच्यात विश्वासाचे नाते हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वयंपुनर्विकासासाठी सर्व सभासदांची परवानगी आणि सक्रिय सहभाग असायला हवा,” असा सूर परिसंवादात उमटला.
शहरातील स्वयंपुनर्विकास प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या सोसायट्यांच्या पुनर्विकास प्रक्रियेला अधिक गती मिळावी, या उद्देशाने ‘सकाळ- रिडेव्हपमेंट फोरम’, रांजेकर रिॲल्टी व पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण अपार्टमेंट महासंघातर्फे रविवारी विशेष परिसंवाद कोथरूड येथे आयोजित केला होता. त्यात स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, कायदेशीर सल्लागार अॅड. मृदुला चितळे, रेरा कायदा सल्लागार ब्रिज फुले, पुनर्विकास समितीचे सदस्य अभिजित अत्रे, सीए व जीएसटी सल्लागार ॲड. महेश भागवत, ‘रांजेकर रिअॅल्टी’चे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध रांजेकर आणि भाग्यश्री निवास सोसायटीचे सचिव समीरण वाळवेकर या तज्ज्ञांनी सोसायट्यांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.
अत्रे म्हणाले, पुनर्विकास प्रक्रियेमध्ये मिळणाऱ्या क्षेत्रफळापेक्षा आम्हाला ५० टक्के क्षेत्रफळ जास्त मिळाले. पटवर्धन यांनी अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला तर, अनिरुद्ध रांजेकर यांनी स्वयंपुनर्विकासाचे प्रकल्प बाहेर येतील व नागरिकांचा भरपूर फायदा होईल, असे स्पष्ट केले.
रवींद्र रांजेकर यांनी प्रास्ताविक केले तर प्रतीक साने यांनी सूत्रसंचालन केले.
मुंबईत १६ इमारतींचा स्वयंपुनर्विकास होऊन रहिवाशांना चाव्या दिल्या आहेत. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही स्वयंपुनर्विकास चांगल्या पद्धतीने करता येईल. स्वयंपुनर्विकासात सोसायटीच्या सभासदांना भरपूर फायदे मिळतील. यासाठी सोसायटीच्या सभासदांनी एकमेकांवर विश्वास ठेवावा. स्वयंपुनर्विकासासाठी कर्ज देण्यास पुणे जिल्हा बॅंकेने धोरण करावे.
- प्रवीण दरेकर, अध्यक्ष स्वयंपुनर्विकास प्राधिकरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.