सिंहगड रस्त्यावरील नाट्यगृहास व्यवस्थापकांची भेट

सिंहगड रस्त्यावरील नाट्यगृहास व्यवस्थापकांची भेट

Published on

पुणे, ता. ५ ः महापालिकेतर्फे सिंहगड रस्त्यावर बांधण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजीराजे भोसले’ या नाट्यगृहाला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नाट्य व्यवस्थापकांसमवेत भेट दिली, तसेच नाट्यगृहाविषयी व्यवस्थापकांच्या सूचना जाणून घेतल्या. या भेटीनंतर आठ वर्षांपासून रखडलेल्या या नाट्यगृहाच्या कामास गती मिळण्याची शक्यता आहे.
या वेळी बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक राजेश कामठे, भवन रचना विभागाचे कार्यकारी अभियंता मंदार धायगुडे यांच्यासह ‘संवाद, पुणे’चे अध्यक्ष सुनील महाजन, नाट्य व्यवस्थापक समीर हंपी, सत्यजित धांडेकर, प्रवीण बर्वे, मोहन कुलकर्णी, मराठी चित्रपट असोसिएशनचे अध्यक्ष बाबा पाटील आदी उपस्थित होते.
नाट्यगृहात एकच डायनिंग हॉल असावा, पहिल्या मजल्यावरील कलादालनात रंगमंचाची व्यवस्था असावी, तालमींच्या सभागृहांलगतच स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी, कार्यक्रम आणि तालमींसाठी छोटेखानी सभागृह असावे, कलाप्रदर्शनाच्या सभागृहाच्या आकारमानाचा पुनर्विचार व्हावा आदी सूचना या वेळी व्यवस्थापकांनी केल्या, तसेच नाट्यगृहाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वी अनेक नाट्यगृहांच्या बांधकामावेळी सूचना लक्षात न घेतल्याने काम पूर्ण झाल्यावर अडचणी उद्‍भवत असल्याची तक्रार कलाकार आणि व्यवस्थापकांकडून नेहमीच केली जाते. या पार्श्‍वभूमीवर अधिकाऱ्यांनी या नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच सूचना जाणून घेत कलाकारांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

आठ वर्षांपासून रखडले काम
या नाट्यगृहाच्या कामाला २०१७ मध्येच सुरुवात झाली. मात्र शहरातील अन्य काही नाट्यगृहांप्रमाणे याही नाट्यगृहाचे काम रेंगाळले आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार सध्या नाट्यगृहाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून २०२६ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. ८०० प्रेक्षक क्षमतेच्या या नाट्यगृहाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांसाठी हे एक महत्त्वाचे आणि सोयीचे सांस्कृतिक केंद्र ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com