पुणे
डॉ. येरवडेकर यांना मानद अधिछात्रवृत्ती
पुणे, ता. ३० : सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या वैद्यकीय आणि आरोग्य विज्ञान विद्या शाखेचे प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर यांना ग्लासगो येथील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जनची ‘मानद अधिछात्रवृत्ती’ प्रदान करण्यात आली.
गेल्या काही दशकांत आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणाच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत डॉ. येरवडेकर यांना रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जनतर्फे ही आंतरराष्ट्रीय मानद अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात आली. वैद्यकशास्त्र, आरोग्य सेवा पुरवठा आणि संबंधित क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींना या सन्मानाने गौरविण्यात येते. डॉ. येरवडेकर यांनी वैद्यकीय शिक्षण, आरोग्य सेवा वितरण आणि सामुदायिक कल्याण यांचे एकात्मिक प्रारूप विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

