प्रतिक्षा यादी जाहीर; गुरुवारपासून पडताळणी

प्रतिक्षा यादी जाहीर; गुरुवारपासून पडताळणी

Published on

पुणे, ता. २ : विद्युत सहायक पदासाठीची ५० टक्के मर्यादेत एक हजार ८४७ उमेदवारांची प्रतीक्षा यादी www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर महाविरणकडून जाहीर करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या परिमंडळ कार्यालयांमध्ये ६ व ७ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.
महावितरणने जाहिरात देऊन ५ हजार ३८१ विद्युत सहायक पदासाठी २० ते २२ मे दरम्यान ऑनलाइन क्षमता चाचणी घेतली होती. त्यानंतर उमेदवारांची निवड यादी व त्यांना वर्ग केलेल्या परिमंडलांची यादी जाहीर करण्यात आली. या सर्व उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जामधील नोंदी, अर्हता, कागदपत्रे व प्रमाणपत्रांची छाननी व पडताळणी संबंधित परिमंडळ कार्यालयांमध्ये २० ते २२ ऑगस्ट व ९ व १० सप्टेंबर दरम्यान पाच दिवसांत करण्यात आली. निवड यादीतील उमेदवारांच्या प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणनिहाय अपात्रता, गैरहजर व इतर कारणांचा विचार करून कंपनी नियमानुसार जाहिरात केलेल्या पदाच्या ५० टक्के मर्यादेपर्यंत प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. तथापि दिव्यांग प्रवर्गाची निवड प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत ‘परिस्थिती जैसे थे’ ठेवण्याचा आदेश १० सप्टेंबर रोजी दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी दिला आहे. त्यानुसार या प्रतीक्षा यादीमध्ये दिव्यांग प्रवर्ग वगळण्यात आला आहे.
विद्युत सहायक पदाच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जांची छाननी व पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडळ कार्यालयांमध्ये येत्या ६ व ७ नोव्हेंबरला होणार आहे. या दोन्ही दिवशी संबंधित परिमंडळांमध्ये सकाळी १० वाजता मूळ कागदपत्रांची पडताळणी सुरू होईल. नमूद दिवशी काही कारणास्तव पडताळणी पूर्ण झाली नाही तर दुसऱ्या दिवशी करण्यात येईल. तथापि, सर्व मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह संबंधित उमेदवारांनी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.
जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहणार नाहीत त्यांची निवड रद्द समजली जाईल व भविष्यात त्यांच्याशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. छाननी व पडताळणीमध्ये जे उमेदवार पात्र होतील त्यांच्या नियुक्तीबाबत संबंधित परिमंडळांमध्ये पुढील कार्यवाही करण्यात येईल. याबाबतची संपूर्ण माहिती व प्रतीक्षा यादी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com