दिवाळी अंक परिचय
स्वागत दिवाळी अंकाचे
-------------------------
पुनवा
द्विशतकाकडे वाटचाल करणारी आणि वाचनाची समृद्ध परंपरा जोपासणाऱ्या पुणे नगर वाचन मंदिराचा हा दिवाळी अंक आहे. मराठी माध्यमात शिकलेल्या व उद्योग जगतात स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविलेल्या ‘मराठी बिग बॉस’ असलेल्या काही प्रातिनिधीक व्यक्तिमत्वांची माहिती अंकात आहे. संगीता पुराणिक, लीना दामले, चंचल काळे, डॉ. वृषाली किन्हाळकर, दिलीप लिमये, नीलिमा बोरवणकर, प्रमोदिनी वडके- कवळे आदींच्या कथा आहेत. डॉ. चित्रलेखा पुरंदरे, मृणालिनी चितळे, डॉ. नीलिमा गुंडी, काशिनाथ देवधर, माधुरी शानभाग, अतुल कहाते, चिन्मयी चिटणीस, विनिता देशपांडे, डॉ. वंदना बोकील- कुलकर्णी, मंगला गोडबोले, रेखा पळशीकर आदींचे लेख आहेत. एकनाथ आव्हाड, राजीव तांबे, डॉ. कैलास दौंड, डॉ. संगीता बर्वे, आश्लेषा महाजन आदींनी लहान मुलांसाठी लेखन केले आहे. अंजली कुलकर्णी, सुजाता पवार, प्राजक्ता वेदपाठक, कल्पना धुमाळ आदींच्या कविता आहेत.
संपादक ः मधुमिलिंद मेहेंदळे, पाने ः १२०.
२) मैत्रांगण
कथा, कविता आणि विविध विषयांवरील ललित लेख ‘मैत्रांगण’ या दिवाळी अंकात आहेत. ‘आम्ही मित्रांत जग पाहतो’ या वाक्यास अनुसरून सर्वसामान्यांनी अभ्यास करून निर्मिलेले साहित्य, असे या अंकाचे स्वरूप आहे. ‘बॉर्डरलेस पँथर्स फाउंडेशन’ या संस्थेतर्फे हा अंक प्रसिद्ध केला जातो. प्रदीप केळुसकर यांची ‘म्हाई’, दगडू गायकर यांची ‘मपला बाप अन् मी’, डॉ. नीलांबरी गानू यांची ‘स्वप्न’, यांसह १५ कथा या अंकात वाचायला मिळतात. डॉ. अमोल पुंडे, दिलीप कजगावकर, सचिन मुळे, सतीश आंबडेकर, रामदास डुंबरे आदी ३५ लेखकांनी ‘ललित’ या विभागात लेखन केले आहे. कविताही वेगळ्या विषयांवरील आहेत. ‘पाककृती’, ‘बोलक्या रेषा’ ही सदरेही आहेत.
पाने : ८८, किंमत : २०० रुपये
-------------
३) धनश्री
कृषी आणि वैद्यकीय क्षेत्रांतील विविध विषयांना स्पर्श करणारे लेख, ही ‘धनश्री’च्या यंदाच्या अंकाची संकल्पना आहे. बाबा भांड यांनी ‘महाराजा सयाजीरावांचे स्त्रीविषयक कार्य’ या विषयावर लिहिले आहे, तर ‘एआयचा शेतीमध्ये वापर’ या विषयावर दीपक शिकारपूर यांचा लेख आहे. डॉ. नीरज व्यवहारे यांनी ‘मराठी भाषा : उत्साह व जबाबदारी’ या विषयावर लिहिले आहे. लेखांसह डॉ. जयश्री हजारे, भारती सावंत, श्रद्धा जगदाळे व इतर लेखकांच्या विविध विषयांवरील कथांचाही अंकात समावेश आहे. कविता, ललित लेख, सिने-नाट्य शब्दकोडे, वार्षिक राशीभविष्य हे विभागही आहेत.
संपादक : शिवाजी घोडे, पाने : ११२, किंमत २५० रुपये
--------------
४) अनुरव
‘आपल्याला प्रभावित करणारे व्यक्तिमत्त्व’ हा ‘अनुरव’ दिवाळी अंकाचा प्रमुख विषय आहे. लेख, कथालेख, ललित लेखांचा अंकात समावेश आहे. कवितांचा विभागही मोठा आहे. आसावरी ऐणापुरे, अर्चना ठोके, कोकिळा ढाके, अद्वैत सोवळे, प्रकाश दीक्षित, श्रीकांत ताम्हणकर, डॉ. संध्या तरटे, विलास फडके, बबलू कराळे, वंदना ताम्हाणे, गौरी कुलकर्णी, रमा परांजपे, रश्मी देवगडे, निशा काळे, सुनीता वैद्य, सार्थक जाधव, तुकाराम खिल्लारे आदींसह अनेक लेखकांनी अंकात लेखन केले आहे.
संपादक : अनुदा कल्याणकर, रवींद्रजी कल्याणकर, पाने : १५६, किंमत ३०० रुपये
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

