तहसीलदारासह नऊ जणांवर गुन्हे दाखल
बोपोडी आणि मुंढव्यातील शासकीय जमिनींचा गैरव्यवहार
अमेडिया कंपनीचा संचालक, तहसीलदारासह नऊ जणांवर गुन्हा

तहसीलदारासह नऊ जणांवर गुन्हे दाखल बोपोडी आणि मुंढव्यातील शासकीय जमिनींचा गैरव्यवहार अमेडिया कंपनीचा संचालक, तहसीलदारासह नऊ जणांवर गुन्हा

Published on

पुणे, ता. ७ : शासकीय जमिनींच्या गैरव्यवहाराची दोन प्रकरणे पुणे शहरात उघडकीस आली आहेत. त्यामध्ये एक कृषी विभागाच्या मालकीची, तर दुसरी शासनाच्या मालकीची मुंढवा येथील जागेची आहे. या दोन्ही प्रकरणात पुणे शहर तहसीलदार यांनी ‘उद्योग’ केल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही प्रकरणात येवले यांच्यासह नऊ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बोपोडी आणि मुंढवा या दोन्ही प्रकरणात नायब तहसीलदार प्रविणा बोर्डे यांनी सरकारतर्फे खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तहसीलदार सूर्यकांत येवले, हेमंत गावंडे (रा. इंद्रा मेमरीज, बाणेर रस्ता), राजेंद्र रामचंद्र विध्वंस, ह्रषीकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस (तिघे रा. नवी पेठ), विद्यानंद अविनाश पुराणिक (रा. इंदूर, मध्यप्रदेश), जयश्री संजय एकबोटे (रा. कुलाबा, मुंबई) या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोर्डे यांच्या तक्रारीनुसार, तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी १२ फेब्रुवारी २०२४ ते १ जुलै २०२५ या कालावधीत अधिकारांचा गैरवापर केला. बोपोडी कृषी विभागाच्या मालकीची पाच हेक्टर ३५ आर जागा अपहार करून, ती खासगी व्यक्तींच्या नावाने मालकी हक्क करून देण्याबाबतचे आदेश दिले. ही जमीन १८८३ पासून कृषी खात्याच्या मालकीची असून, शासनाच्या नावावर नोंद असतानाही येवले यांनी मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ हा महापालिका क्षेत्रात लागू नसतानाही त्या अधिनियमान्वये बेकायदेशीर कागदपत्रे तयार केली. तहसीलदार येवले यांनी व्हीजन प्रॉपर्टीतर्फे कुलमुखत्याधारक हेमंत गावंडे यांच्या माध्यमातून राजेंद्र विध्वंस, ह्रषीकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे, या सर्वांसोबत संगनमत करून शासकीय जमिनीवर बेकायदेशीर मालकी हक्क दाखवणारे आदेश तयार केले, असा आरोप फिर्यादीने तक्रारीत केला आहे. या तक्रारीनंतर खडक पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
मुंढवा येथील शासकीय मालकीची जमीन शीतल तेजवानी आणि अमेडिया एंटरप्रायझेसने येवले यांच्याकडे अर्ज केला होता. त्या अर्जावरून ती जागा तेजवानी आणि अमेडिया एंटरप्राइजेस यांच्या ताब्यात देण्याबाबत बॉटनिकल गार्डनला जागा खाली करण्यासाठी येवले यांनी नोटीस दिली. बेकायदेशीर नोटीस दिल्याप्रकरणी येवले यांच्यासह शीतल तेजवानी आणि अमेडिया एंटरप्रायझेसचे दिग्विजय पाटील यांच्याविरोधात बोर्डे यांनी फिर्याद दिली आहे.
-------------- ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com