आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
पुणे, ता. ८ : आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिकीकरणाच्या युगात व्यापाराला सीमारेषा राहिलेल्या नाहीत. भारतीय उत्पादने जगभरात पोहोचू शकतात, फक्त योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि धोरणे असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर १५ नोव्हेंबरपासून सहा दिवसांचे ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ हे प्रशिक्षण आयोजिले आहे. प्रशिक्षणात एक्झीम धोरण, इन्को टर्म्स, शिपिंग आणि कंटेनर व्यवस्थापन, दररचना व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि सरकारी योजना यावर अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. वाटाघाटी करण्याच्या कौशल्यापासून कागदपत्रांची पूर्तता कशी करावी या सर्व बाबींचा प्रशिक्षणात समावेश असणार आहे. स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजकांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल.
इन्स्टंट ग्रेव्ही व मिक्सेस कार्यशाळा
धावपळीच्या जीवनशैलीमुळे झटपट, स्वादिष्ट आणि पौष्टिक अन्नाची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रेडी टू कुक अन्न उद्योगामध्ये व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या संदर्भात मार्गदर्शन करणारी व्यावसायिक कार्यशाळा १६ नोव्हेंबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत इन्स्टंट डोसा, इडली, वडा, ढोकळा, पोहे, उपमा, शिरा, पुलाव, दाल खिचडी, फालुदा, खीर, रबडी, आइस्क्रीम मिक्स, गुलाबजामून, पकोडा, तसेच मल्टीग्रेन पराठा, थालीपीठ भाजणी, उपवास भाजणी यासारखे विविध इन्स्टंट फूड मिक्सेस शिकवले जातील. तसेच कार्यशाळेत फूड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, पॅकेजिंग, लेबलिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग, यंत्रसामग्री, वितरण व्यवस्था, कॉस्टिंग व कायदेशीर बाबी यांचाही समावेश असेल.
वास्तुशास्त्र नियोजन कार्यशाळा
वास्तुशास्त्रानुसार घर, कार्यालय वा दुकान कसे असावे इ. बाबत माहिती करून देणारी ऑनलाइन कार्यशाळा १७ नोव्हेंबरपासून आयोजिली आहे. घर वास्तुदोषमुक्त असावे ही इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा, उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्व, दिशा आणि प्रभाव, वास्तुपुरुष मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे व कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, वास्तुचे आयुष्य आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२

