ज्योतिष कथनातून दुखः निवारण करावे : अतुलशास्त्री भगरे

ज्योतिष कथनातून दुखः निवारण करावे : अतुलशास्त्री भगरे

Published on

पुणे, ता. १० : ‘‘ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्यातील अंदाज सांगणारे नाही, तर जीवनातील समस्यांचे आकलन करून दुःख दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे,’’ असे मत अतुलशास्त्री भगरे यांनी व्यक्त केले.
‘गौरीकैलास ज्योतिष संस्थे’तर्फे ‘वार्षिक ज्योतिष महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी अनिल चांदवडकर, पं. विजय जकातदार, पं. नंदकुमार जोशी, रमेश पलंगे, पं. दिलीप अवस्थी, पुष्पलता शेवाळे, डॉ. जयश्री बेलसरे, जानकी पाचर्णे, रोहित वर्मा, शुभांगिनी पांगारकर आदी उपस्थित होते. दरम्यान, दीर्घकालीन ज्योतिष संशोधन कार्यासाठी डॉ. चंद्रकांत शेवाळे यांना ‘कै. मनोहर केंजळे स्मृती पुरस्कार-२०२५’ प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या समारोप सत्रात आदिनाथ साळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले; तर उपस्थितांना ‘फलादेशाचे तंत्र’ हे पुस्तक स्मृतिचिन्ह म्हणून देण्यात आले. गौरी आणि कैलास केंजळे यांनी स्वागत केले, तर अपर्णा गोरेगावकर यांनी सूत्रसंचालन केले.

Marathi News Esakal
www.esakal.com