पुणे
पुणे विद्यापीठात वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध उपक्रम
पुणे, ता. १० : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्राच्या वतीने ‘वन्यजीव सप्ताहा’निमित्त वन्यजीव छायाचित्र स्पर्धा, वन्य प्राण्यांचे मुखवटे बनविणे, जंगल व देवराई भ्रमंती असे उपक्रम घेण्यात आले. यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात साजरा होणाऱ्या वन्यजीव सप्ताहात जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती करण्यात येते. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी प्रेम, जबाबदारी आणि संवेदनशीलता विकसित होते, असे केंद्राच्या समन्वयक प्रा. अंजली क्षीरसागर यांनी सांगितले.

