दिवाळी अंक- परीक्षण

दिवाळी अंक- परीक्षण

Published on

१) ग्रहसंकेत
ज्योतिष व उपासनेचा रंजक आणि माहितीपूर्ण वेध घेणाऱ्या या पंचविसाव्या दिवाळी अंकात नक्षत्रसंकेत हा एक खास विभाग आहे. आगामी वर्षाचे अचूक आणि सर्वांगीण असे काथिर सुबय्या यांनी लिहिलेले राशिभविष्य या अंकाचे प्रमुख आकर्षण आहे. संजय मनोहर, उदयराज साने, स्मिता गायकवाड, विश्वास गणपुले, मोहन फडके, मीनाताई महागांवकर, जयंत झरेकर, मेधावी, मोहन खेर, चंद्रशेखर देसाई, मृणालिनी जमदग्नी यांसारख्या अनुभवी लेखकांनी या अंकात आपले योगदान दिले आहे. नक्षत्रांचा महिमा, उपासना, साधना, ध्यान, नक्षत्रानुसार होणारी माणसांची जडणघडण, मागच्या जन्मातील प्रवास, भारतासाठी नवीन वर्ष कसे जाणार, शरीरमनाचे स्वास्थ्य आदी विषयांवर आधारित असा ज्योतिषविषयक उपयुक्त मार्गदर्शन देणारा हा विशेषांक आहे.
संपादन ः संदीप पुरुषोत्तम खाडिलकर, पाने : १८२, किंमत : २५० रुपये

२) शब्दवैभव
‘उत्सव प्रेमाचा’ या विषयावर आधारित हा अंक आहे. ‘प्रेम एक सुंदर आविष्कार’ हा राजीव नंदकर यांचा लेख एक वेगळा दृष्टिकोन वाचकाला देतो. ‘प्रेम ते सहजीवन’ हा स्वरूपा कुलकर्णी यांचा लेख सहजीवनाकडे कसे पहायचे, हे शिकवतो. प्रेमगीतांवर आधारित स्वाती बालूरकर यांचा लेखही वाचनीय आहे. वैष्णवी संयोग यांचा प्रेमाचा बदलता प्रवास हा लेखही या अंकाचे आकर्षण आहे. तसेच रोहिणी भट्टाचार्य, गायत्री चौधरी, अविनाश भोंडवे, विशाल जगताप, मनोज पालवे, आश्लेषा महाजन, आरती दातार, धनश्री बगाडे, स्मिता जोशी, अनिल रोंघे, राहुल देशमुख, प्रिया कांबळे, सायली जोशी, धनंजय उपासनी, अश्विनी भावे, संप्रती जोगे आदी लेखकांनी प्रेमाविषयी आपले अनुभव, विचार या अंकात मांडले आहेत.
संपादक : डॉ. रवी चौधरी, पाने : ११२, किंमत : २०० रुपये

३) लोकजागर
विविध विषयांवरील कथा, लेख, कविता यांनी अंक सजला आहे. आई- वडिलांच्या आठवणींचा जागर रवींद्र बेडकीहाळ यांनी जागवला आहे. त्याचबरोबर विलास वरे, सुरेश शिंदे, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, प्रा. विक्रम आपटे, प्रा. रवींद्र कोकरे, विकास शिंदे, सुधीर पिटके, सुतेजा दांडेकर, दत्तात्रेय मानगुडे आदींचे लेखन अंकात आहे. शरद अत्रे, सुभाष सरदेशमुख, एकनाथ गायकवाड, ताराचंद आवळे, वीरेन सटाले, जगन्नाथ कांबळे, प्रा. राजाराम बनसकर आदींच्या कविता आहेत. महादेव साने यांची व्यंगचित्रे आहेत.
संपादक ः रोहित वाकडे, पाने ः १२०, किंमत ः १०० रुपये
-------------------
४) सहकार सुगंध
सहकार क्षेत्राला हा अंक वाहिला आहे. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची सहकारक्षेत्राविषयी घेतलेली मुलाखत ही या अंकाचे वैशिष्ट्ये आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका पारदर्शक होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान उपयुक्त ही अनिल कवडे यांची मुलाखत उपयुक्त आहे. सहकारी ग्राहक भांडारांपुढील आव्हाने यावर सूर्यकांत पाठक यांचा लेख आहे. साखर उद्योगाची आगामी वाटचाल, याविषयी प्रकाश नाईकनवरे यांनी वेध घेतला आहे. दुग्ध व्यवसायासाठी तंत्रज्ञानयुक्त गोठ्यांची आवश्‍यकता यावर डॉ. विवेक क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले आहे. सहकारी बॅंकासाठी सोने तारण कर्ज वितरण यावर श्रीकांत जाधव यांनी लिहिले आहे. नागरी सहकारी बॅंकासमोर अर्थव्यवस्थेची तीव्र स्पर्धा या विषयी डॉ. अभय मंडलिक यांनी ऊहापोह केला आहे.
संपादक ः भालचंद्र कुलकर्णी, पाने ः ७०, किंमत ः १०० रुपये
--------------
५) चांगुलपणाची चळवळ
या वर्षीचा अंक रक्तदान, अवयवदान आणि देहदान या विषयांना वाहिलेला आहे. ‘चांगुलपणाची चळवळ’ या दृष्टिकोनातून अंक प्रसिद्ध केला आहे. रक्तदान आणि त्याविषयीची माहिती आर. बी. जोशी यांनी दिली आहे, देहदान ही काळाची गरज कशी आहे, त्याचे किती महत्त्व आहे, हे वैशाली भारंबे यांच्या लेखातून समजते. अवयवदानाची महती लक्ष्मीकमल गेडाम यांनी आपल्या लेखातून अधोरेखित केली आहे. याशिवाय आरती गोखले, आबासाहेब शिर्के, सुनील देशपांडे, शीतल धडफळे, विनय कोपरकर, मानसी ठाकूर, ज्योती बडे, मोहन टिल्लू, जगदीश हिरेमठ, गायत्री पंडित, संगीता वाघ, प्रसाद घारे, अविनाश बनसोडे, वृंदा पुसाळकर, राहुल जोशी, मीना साठे, समीर दातार, निमिष पोतनीस यांसारख्या अभ्यासक,
तज्ज्ञ मान्यवरांचे लेखन अतिशय माहितीपूर्ण आणि मार्गदर्शनपर आहे.
संपादक : शुभांगी नितीन मुळे, पाने : १६०, किंमत : २५० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com