शेवाळेवाडीत पेट्रोल टँकरला आग; अग्निशामक दलामुळे दुर्घटना टळली
पुणे, ता. १० : हडपसर येथील शेवाळेवाडी चौकात पेट्रोलने भरलेल्या टँकरला आग लागल्याची घटना सोमवारी घडली. मात्र, अग्निशामक दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
लोणी येथून सोमवारी सकाळी पुण्याच्या दिशेने निघालेल्या टँकरमध्ये पाच हजार लिटर पेट्रोलचा साठा होता. टँकर शेवाळेवाडी चौकात पोहोचताच केबिनला अचानक आग लागली. रस्त्यावर उभ्या वाहनाला आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. चालकाने वेळीच वाहनातून उडी मारून जीव वाचवला.
या घटनेची माहिती मिळताच हडपसर, काळेपडळ, बी. टी. कवडे रस्ता आणि खराडी अग्निशामक केंद्रांमधील पथके घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या मोहिमेत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, नीलेश लोणकर, वाहनचालक नारायण जगताप, राजू शेख, तांडेल शौकत शेख, फायरमन बाबा चव्हाण, चंद्रकांत नवले, रामदास लाड आणि अविनाश ढाकणे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
अग्निशामक दलाची वाहने वेळेत पोहोचली. जवानांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी हानी टळली. अन्यथा भीषण दुर्घटना घडली असती.
- देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

