‘मुळशी’च्या पाण्याला ‘खडकवासला’पर्यंत वाट

‘मुळशी’च्या पाण्याला ‘खडकवासला’पर्यंत वाट

Published on

उमेश शेळके ः सकाळ वृत्तसवा

पुणे, ता. ११ : मुळशी धरणातील पाणी पुणे शहरात आणण्यासाठी दोन पर्याय पुढे आले आहेत. मुळशी धरणातून बोगद्याद्वारे ते पाणी खडकवासला धरणात आणणे हा एक, तर मुळशी ते खडकवासला धरणदरम्यान जलवाहिनी टाकणे असा दुसरा पर्याय. या दोन्ही पर्यायासंदर्भात टाटा कंपनी आणि जलसंपदा विभाग यांच्यात बैठकीनंतरच निर्णय घेण्यात येणार आहे. त्यास मान्यता मिळाली, तर पहिल्या टप्प्यात या मुळशी धरणातून सात टीएमसी पाणी शहरासाठी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठक मुंबई येथे झाली. या वेळी अधिकारी आणि आमदार राहुल कुल यावेळी उपस्थित होते. त्यामध्ये मुळशी प्रकल्पातील पाणी विद्युतनिर्मितीसाठी वापरल्यानंतर ते पाणी समुद्रात जाऊन मिळते. त्यापैकी नऊ टीएमसी पाणी हे पूर्वेकडे वळविण्याच्या विषयावर चर्चा झाली. त्यामध्ये हे पाणी कशा पद्धतीने वळविता येईल, अशा विविध पर्यायांवर बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये हे दोन पर्याय पुढे आले आहेत. पहिल्या टप्प्यात मुळशी धरणातील सात टीएमसी पाणी खडकवासला धरणात आणण्यासाठी नुकतीच या भागाची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. मुळशी धरणातील पाणी लिफ्ट करून आणणे खूप खर्चिक काम आहे. त्याऐवजी बोगद्यातून ग्रॉव्हिटीने ते आणणे शक्य आहे. मुळशी धरण हे उंचावर आहे. त्यातून हे पर्याय पुढे आले आहेत.

महत्त्वाचे
१) मुळशी धरणातून खडकवासला धरणात बोगद्याच्या माध्यमातून पाणी आणता येऊ शकते, हा एक पर्याय पुढे आला आहे. त्यासाठी सुमारे सहाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित
२) परंतु हा पर्याय वेळखाऊ आणि खर्चिक
३) त्याऐवजी या दोन्ही धरणादरम्यान बोगद्याऐवजी जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी थेट धरणात आणणे हा दुसरा पर्याय
३) तो कमी खर्चिक आणि तीन वर्षाच्या कालवधीत पूर्ण होऊ शकतो. त्यासाठी भूसंपादनाचा खर्चदेखील नगण्य आहे
४) या संदर्भात प्रथम जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठक घेऊन या दोन्ही पर्यायांवर चर्चा करण्याचे निश्‍चित
५) कंपनीबरोबरच चर्चा करून पर्याय निश्‍चित झाल्यानंतर मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री आणि टाटा कंपनी यांच्या स्तरावर पुन्हा एक अंतिम बैठक घेऊन पुढील कार्यवाही
६) पिण्याच्या पाण्यासाठी ही योजना असल्यामुळे कृष्णा लवादाचीदेखील त्यास कोणतीही अडचण येणार नाही
७) त्यामुळे लवकरच यावर निर्णय होईल अशी अधिकाऱ्यांना अपेक्षा

अशी आहे स्थिती
- मुळशी धरण ब्रिटिशकालीन
- धरणाची मालकी सध्या टाटा कंपनीकडे
- धरणातील पाण्याचा वापर करून वीजनिर्मिती केली जाते
- धरणाची एकूण क्षमता सुमारे १८.५० टीएमसी
- वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी मागील ९० वर्षांपासून मुळशी, लोणावळा, वळवण, शिरवटा, सोमवाडी आणि ठोकरवाडी या धरणांमधून दरवर्षी ४२.५० टीएमसी पाणी पश्चिमेकडे वळविण्यात येते
- टाटा जलविद्युत प्रकल्पातून वळविण्यात येणारे पाणी पुन्हा भीमा खोऱ्यातील दुष्काळी भागांना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील
- हे पाणी भीमा खोऱ्यात वळविण्यात आले तर पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पिण्यासाठी, औद्योगिक कंपन्यांसाठी आणि सिंचनासाठी जादा पाणी उपलब्ध होऊ शकते

मुळशी धरणातील पाणी पूर्वेकडील भागांसाठी मिळावे, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या धरणातील पाणी खडकवासला धरणात आणण्यासाठी दोन पर्याय पुढे आहेत. या दोन्ही पर्यायांवर शासनस्तरावर झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्यक्ष धरणांच्या ठिकाणी पाहणीदेखील करण्यात आली आहे. टाटा कंपनीबरोबर बैठक झाल्यानंतर पर्याय निश्‍चित करण्यात येणार आहे.

- राहुल कुल, आमदार, दौंड
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com