रोबोटिक सिस्टीमच्या साहाय्याने 
साईश्री हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया

रोबोटिक सिस्टीमच्या साहाय्याने साईश्री हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया

Published on

पुणे, ता. ११ ः वाकड येथील साईश्री व्हिटालाइफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका महिलेवर अत्याधुनिक फोर्थ जनरेशन वेलीस रोबोटिक सिस्टीमच्या साहाय्याने ‘बायलॅटरल टोटल नी रिप्लेसमेंट’ (टीकेआर) ही शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीपणे झाली. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात अशा प्रकारची अत्याधुनिक शस्त्रक्रिया होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
साईश्री व्हिटालाइफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष व रोबोटिक सांधे प्रत्यारोपणातील तज्ज्ञ डॉ. नीरज आडकर यांच्या नेतृत्वाखाली सरस्वती येळवंटगे या रुग्णावर ही शस्त्रक्रिया झाली. वेलीस रोबोटिक सिस्टीम हे सांधेस्थान प्रत्यारोपण तंत्रज्ञानातील अत्यंत प्रगत पाऊल असून, प्रत्येक रुग्णाच्या शरीररचनेनुसार अधिक अचूक, नेमके आणि वैयक्तिकरित्या जुळणारे परिणाम देणारे हे तंत्रज्ञान आहे.
“रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नेमकेपणाने हाडांमध्ये कट घेऊन आपण त्यात इम्प्लांट बसवू शकतो. त्यामुळे गुडघ्यांची स्थिरता वाढते, रुग्ण लवकर बरा होतो आणि दीर्घकालीन परिणाम अधिक चांगले मिळतात,” असे डॉ. आडकर यांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर येळवंटगे यांची प्रकृती उत्तम असून त्या सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजिओथेरपी घेत आहेत. वेलीस रोबोटिक सिस्टीमचे आगमन ही साईश्री व्हिटालाइफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी तसेच पीसीएमसीसाठी एक मोठी प्रगती ठरली आहे. या तंत्रज्ञानामुळे या भागातील रुग्णांना जागतिक दर्जाची आरोग्यसेवा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आता अधिक जवळच्या स्तरावर उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com