पूरग्रस्तांसाठी कंपन्यांची ‘सीएसआर’अंतर्गत मदत ‘सकाळ रिलीफ फंड’ला पबमॅटिक इंडियाकडून तीन लाख रुपयांची देणगी
पुणे, ता. १३ ः पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंड’ला अनेक कंपन्यांची ‘सीएसआर’अंतर्गत मदत मिळत असून, पुण्यातील डिजिटल जाहिरात तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘पबमॅटिक इंडिया प्रा. लि.’ कंपनीने सामाजिक बांधिलकी स्वीकारत ‘सीएसआर’अंतर्गत पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंड’ला तीन लाख रुपयांची मदत केली, तर बाणेर येथील अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेतील शाळेच्या विद्यार्थ्यांनी संकलित केलेला निधी आणि संस्थेतर्फे दिलेले योगदान अशी एकूण एक लाख ६२ हजार रुपयांची मदत करण्यात आली.
याशिवाय माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त वानवडी येथील ‘विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान’ संचालित विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने ५१ हजार रुपयांची मदत करण्यात आली.
-----------------------------------------------------------------------------------------------
...यांनी केली व्यक्तिगत मदत
ब्लूम कंबस्शन इंडिया प्रा. लि. कंपनीच्या कर्मचारीवर्गाकडून (३५ हजार २८२ रुपये), राहुल पाठक (१३ हजार ४२१रुपये), दत्तात्रेय फडके (१० हजार रुपये), तुषार ताम्हाणे (४,९२७ रुपये), अविनाश सुर्वे (३,९८२ रुपये), विक्रम वझे (दोन हजार रुपये), विजया देवाडिगा (१,९९३ रुपये), राहुल ठाकरे (१,८५५ रुपये), अर्जुन शिंदे (१,७१६ रुपये), आशिष पाटील (१,७१३ रुपये), एसएससी बॅच (१९७१) जनता विद्यालय, पोहरे व विजय नारकर प्रत्येकी (१,५०० रुपये), ओंकार महाडिक (१,४३९ रुपये), दत्तात्रेय पाटेकर (१,३३५ रुपये), बाळासाहेब शेडगे, विमल ढमाळ व प्रदीप वैद्य प्रत्येकी (१,००० रुपये), अनिकेत हिरे (९०० रुपये), श्रीनिवास कुलकर्णी व शशिकला देशपांडे प्रत्येकी (५०० रुपये) यांनी मदत केली.
---------------------------------------------------------------------------------------------
फोटो ः 67620, 67622, 67623, 67626
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

