अभय योजना राबविण्यास मंजुरी

अभय योजना राबविण्यास मंजुरी

Published on

पुणे, ता. १४ ः महापालिकेकडून थकीत मिळकत कराच्या वसुलीसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली होती. शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मिळकतकर विभागाकडे मिळकत कर थकविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मिळकत कर थकविणाऱ्यांवर महापालिकेकडून दरमहा दोन टक्के शास्ती कर लादला जातो. आर्थिक वर्ष संपल्यानंतरही मिळकत कर न भरणाऱ्यांना नोटीस पाठवून महापालिका त्यांना कर भरण्यासाठी प्रोत्साहन देते. मात्र, वारंवार नोटीस बजावूनही कराची थकबाकी असणाऱ्या नागरिकांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्याचे कामही महापालिका करते, पण लिलावाची प्रक्रिया अतिशय संथ असल्याने त्यासही अडचणी येतात. तर दुसरीकडे, मिळकतकराची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची सद्यःस्थिती आहे. हे चित्र बदलण्यासाठी महापालिकेने पुन्हा एकदा अभय योजना राबविण्याचे नुकतेच जाहीर केले होते. ही योजना महापालिकेच्या जुन्या हद्दीसह नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील नागरिकांसाठीही आहे. यापूर्वी योजनेचा लाभ घेणाऱ्यांना मात्र नव्या योजनेत लाभ न देण्याचे धोरण महापालिकेने निश्‍चित केले होते. या योजनेचा लाभ रहिवासी, व्यावसायिक यांसह सर्व प्रकारच्या थकबाकीदारांना मिळणार आहे. या योजनेमुळे थकबाकीदांना दंडाच्या रकमेवर ७५ टक्के सूट मिळणार आहे. या योजनेचा लाभ १५ जानेवारीपर्यंतच घेता येणार आहे.
-----------------
सुट्टीच्या दिवशीही कर भरण्याची सुविधा
दरम्यान, स्थायी समितीच्या बैठकीमध्ये अभय योजना पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यास महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी मान्यता दिली. त्यामुळे नागरिकांना थकीत मिळकत कर भरण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. थकबाकीदारांनी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्र, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आय.सी.आय.सी.आय. बॅंक, जनता सहकारी बॅंक व कॉसमॉस बॅंक तसेच ऑनलाइनद्वारे propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावर कर भरता येणार आहे. याबरोबरच महापालिकेचे सर्व नागरी सुविधा केंद्र शनिवारी व रविवारी, तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com