खासगी ट्रॅव्हल्ससाठी नवे नियम
पुणे, ता. १७ : शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स आणि आराम (लक्झरी) बसना नवीन मार्ग, थांब्यांची व्यवस्था आणि वर्दळीच्या वेळी (पिक अवर्स) कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू केली असून, नागरिकांकडून हरकती सूचना मागवून अंतिम आदेश लवकरच जाहीर केला जाणार आहे.
रस्त्यावर होणारी बसची गर्दी आणि वर्दळीच्या वेळी कोंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेच्या कार्यालयात ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात झालेल्या चर्चेनुसार नवा आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी सुरू केली आहे. पुढील १५ दिवसांत नागरिक, संस्थांकडून हरकती सूचना मागविण्यात येतील. त्यानुसार अंतिम आदेश काढण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
शहरातून सुटणाऱ्या आराम (लक्झरी) बससाठी नवे मार्ग
१) मित्रमंडळ चौक (स्वारगेट) - सातारा रस्ता
मार्गावरील थांबे : मित्रमंडळ चौक, कात्रज सर्प उद्या
मार्ग : व्होल्गा चौक- मार्केट यार्ड - सातारा रस्ता- कात्रज चौक- नवले पूल- नवीन कात्रज बोगदा
२) पद्मावती पार्किंग - सोलापूर रस्ता
मार्गावरील थांबे : भैरोबानाला, शेवाळवाडी
मार्ग : व्होल्गा चौक, सातारा रस्ता, मार्केट यार्ड चौक- वखार महामंडळ- गंगाधाम- लुल्लानगर- वानवडी- भैरोबानाला- पेट्रोल पंप - यूटर्न- हडपसर
३) पद्मावती पार्किंग- मुंबई-पुणे महामार्ग मार्ग
मार्ग : दांडेकर पूल- सेनादत्त चौक- म्हात्रे पूल- नळस्टॉप- पौड रस्ता - चांदणी चौक - मुंबई- पुणे हायवे
अतिरिक्त थांबा : नाही
४) अहिल्यानगर रस्ता
थांबा : संगमवाडी पार्किंग
मार्ग : सादलबाबा चौक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक - गोल्फ चौक - शास्त्रीनगर - नगर रस्ता - वाघोली
अतिरिक्त थांबे : खराडी बायपास, वाघेश्वर पार्किंग
५) वारजे जंक्शन- अहिल्यानगर रस्ता
मार्ग : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कर्वे रस्ता, पौड फाटा, एसएनडीटी लॉ कॉलेज, सेनापती बापट रस्ता, संचेती चौक- संगमवाडी पार्किंग, सादलबाबा चौक, गोल्फ चौक, शास्त्रीनगर चौक, नगर रस्ता- वाघोली.
बाहेरील शहरांतून येणाऱ्या बससाठी मार्ग
१) मुंबई - आळंदी रस्ता - वाघोली रस्ता
२) थांबे : संगमवाडी, खराडी, वाघेश्वर पार्किंग
मुंबई- सोलापूर रस्ता
१) थांबे : संगमवाडी, खराडी बायपास, शेवाळवाडी
मुंबई - सातारा रस्ता
१) शहरात प्रवेश नाही; फक्त पुणे-बंगळूर बायपास मार्गे पुढे प्रवास.
महत्त्वाचे निर्बंध
- दिलेल्या मार्गांव्यतिरिक्त ट्रॅव्हल्स बसना शहरात प्रवेश नाही
- सायंकाळी ६ ते १० या वर्दळीच्या वेळी कोणत्याही मार्गावर आराम बसना प्रवेश बंद
- कोणत्याही बसथांब्यावर तीन मिनिटांपेक्षा जास्त थांबण्यास सक्त मनाई
.........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

