‘योग ॲण्ड बियाँड’ जाणून घेण्याची संधी

‘योग ॲण्ड बियाँड’ जाणून घेण्याची संधी

Published on

पुणे, ता. १९ ः आध्यात्मिक गुरू व जागतिक वक्ते श्री एम यांचे मौलिक विचार ऐकण्याची संधी ‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ या बहुचर्चित आरोग्य व वेलनेसच्या महोत्सवात नागरिकांना मिळणार आहे. कोरेगाव पार्कजवळ मंगलदास रस्त्यावरील हॉटेल कॉनरॉडमध्ये सात डिसेंबर रोजी श्री एम यांचे व्याख्यान होणार आहे.
सर्व वयोगटांतील नागरिकांच्या निरोगी शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या स्वास्थ्यपूर्ण संतुलित जीवनशैलीसाठी सर्वाधिक उपयुक्त व मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ या उपक्रमांतर्गत श्री एम ‘योग ॲण्ड बियाँड’ या विषयावर संवाद साधणार आहेत. या महोत्सवासाठी ‘सुहाना मसाले’ हे मुख्य प्रायोजक आहेत. विश्‍वकर्मा विद्यापीठ हे सहप्रायोजक असून, भारती विद्यापीठ हे सहयोगी प्रायोजक आहेत. यात ७ डिसेंबरला श्री एम यांचे विशेष व्याख्यान होणार आहे.
श्री एम यांनी २० वर्षांपूर्वी ‘द सत्संग फाउंडेशन’ची स्थापना केली. अनुयायी असणाऱ्या आध्यात्मिक साधकांना भेटण्याचे व्यासपीठ मिळावे म्हणून या फाउंडेशनची स्थापना केली. शांतता व सौहार्दाच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी २०१५-१६ मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर ही साडेसात हजार किलोमीटरची ‘वॉक फॉर होप’ पदयात्रा काढली. देशातील ११ राज्यांतून ही १५ महिन्यांची यात्रा सुमारे एक कोटी लोकांपर्यंत पोचली.

समाजकार्य आणि लेखन
सत्संग फाउंडेशनच्या बॅनरखाली श्री एम यांनी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात विविध प्रकल्प राबविले. फाउंडेशनकडून आंध्र प्रदेशातील मदनपल्लेत व उत्तर प्रदेशमधील लाथिरामध्ये विनामूल्य शाळा आणि कौशल्यविकास केंद्र चालविले जाते. मदनपल्लेजवळील चौडेपल्ले या छोट्याशा गावात स्वजाणीव शोधण्यासाठी ‘सेक्रेड ग्रोव्ह’ सुरू करण्यात आले. येथे आयुर्वेदिक उपचार व योगशास्त्रावरील आरोग्य केंद्रही आहे. त्यांचे ‘अप्रेंटिस्ड टू ए हिमालयन मास्टर-ए योगीज् ऑटोबायोग्राफी’ हे आत्मचरित्र २०११ मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर त्यांच्या आत्मचरित्राचा दुसरा भाग ‘द जर्नी कंटिन्यूज’ २०१७ मध्ये प्रकाशित झाला. आत्मचरित्राबरोबरच त्यांची उपनिषदे, ध्यानावरील अनेक पुस्तके तसेच ‘शून्य’ ही कादंबरीही प्रसिद्ध झाली. त्यांना जानेवारी २०२० मध्ये ‘पद्मभूषण’ने सन्मानित करण्यात आले.

या सत्राला विनामूल्य प्रवेश आहे, मात्र नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा, असे आवाहन ‘सकाळ माध्यम समूहा’ने केले आहे. क्षमतेपेक्षा नोंदणी जास्त झाल्यास वैयक्तिक मेसेजद्वारे कळविले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com