‘पीएफएमएस’द्वारे कोट्यवधी रुपयांची बचत : श्याम दुबे

‘पीएफएमएस’द्वारे कोट्यवधी रुपयांची बचत : श्याम दुबे
Published on

पुणे, ता. ११ : ‘‘भारत सरकारने विकसित केलेल्या ‘पीएफएमएस’ प्रणालीने नेटवर्क म्हणून देशामध्ये एक विशाल डिजिटल परिसंस्था स्थापित केली आहे. या प्रणालीने दुबार आणि बोगस लाभार्थ्यांचे निर्मूलन करण्यात दिलेल्या योगदानामुळे देशाच्या राजकोषात सुमारे तीन लाख ४८ हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे,’’ असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाचे महालेखा नियंत्रक श्याम एस. दुबे यांनी केले.

महालेखा नियंत्रक कार्यालय, वित्त मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीवरील दुसऱ्या प्रादेशिक परिषदेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण व दीव आणि दादरा, नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचे संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि भागधारक उपस्थित होते.

दुबे म्हणाले, ‘‘पीएफएमएस प्रणालीने सुरळीत व पारदर्शक निधी प्रवाह कार्यपद्धती सुनिश्चित करण्यासाठी विविध मंत्रालये, शासकीय विभाग, बँका, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांना एकत्रीकृत केले आहे.’’

यशदाचे महासंचालक एन. के. सुधांशू यांनी मनोगतामध्ये निधी व्यवस्थापनात समयोचितता आणि पारदर्शकता आणण्यात केलेल्या क्रांतीबद्दल भारत सरकारने विकसित केलेल्या ‘पीएफएमएस’ या प्रणालीची प्रशंसा करून शासनाकडील निष्क्रिय निधीचे प्रमाण कमी करण्यात ‘एसएनए - स्पर्श’ महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com