‘एआय’वर आधारित स्मार्ट ई-बस लवकरच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

‘एआय’वर आधारित 
स्मार्ट ई-बस लवकरच
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
Published on

पुणे, ता. ११ ः राज्य सरकारचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळानेदेखील अंगीकारले असून, भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या पाच हजार बसगाड्यांपैकी दरवर्षी किमान १ हजार बसगाड्या या ई- बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानावर त्या आधारित असतील. यात एकात्मिक सुरक्षा प्रणालीचा अंतर्भाव असणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
पुण्यात एका कार्यक्रमाप्रसंगी प्रताप सरनाईक हे उपस्थित होते. यावेळी स्मार्ट बसचे सादरीकरण झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नव्या ई-बसमध्ये चालकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. गाडी चालवताना जर चालक जांभया देत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर हे कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील. तशा प्रकारचा धोक्याचा अलार्मदेखील वाजेल. तसेच महिलांची सुरक्षितता लक्षात घेता, प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठीदेखील बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत आटोक्यात आणण्यासाठी फोम बेस अग्निशामक यंत्रणा बसमध्ये असावी, असे मत मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. याबरोबरच स्वारगेटच्या घटनेनंतर बंद बस ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे उघडली जाणार नाही. तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलार्म वाजेल, अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्ट ई-बसमध्ये बसविण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com