कांदा पीक व्यवस्थापन 
विनामूल्य ऑनलाइन कार्यशाळा

कांदा पीक व्यवस्थापन विनामूल्य ऑनलाइन कार्यशाळा

Published on

पुणे, ता. १८ : शेतकऱ्यांसाठी कांदा पिकाच्या शास्त्रीय लागवड तंत्रज्ञानावर आधारित विनामूल्य ऑनलाइन कार्यशाळा २३ नोव्हेंबरला आयोजिली आहे. दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत झूम माध्यमातून होणाऱ्या या कार्यशाळेत कांदा उत्पादन वाढीसाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून करण्यात येणार आहे. भारतातील प्रमुख नगदी पिकांपैकी कांदा हे सर्वाधिक नफ्याचे पीक मानले जाते. योग्य मातीची निवड, सुधारित बियाणे, अचूक खत व्यवस्थापन आणि रोगनियंत्रण या घटकांवर भर देऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ साधता येते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सर्वांगीण मार्गदर्शनासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. कार्यशाळेत मशागत व जमिनीची तयारी, उच्च उत्पन्न देणाऱ्या जातींची निवड, रोपवाटिका पद्धती, लागवड व्यवस्थापन, सिंचन तंत्र, खतांचा संतुलित वापर, कीड व रोग नियंत्रणासाठी जैविक आणि रासायनिक पर्याय, तण व्यवस्थापन, तसेच काढणी व साठवणुकीच्या पद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाईल. याशिवाय कांदा प्रक्रिया उद्योग, पावडर, फ्लेक्स आणि मूल्यवर्धित उत्पादनांमधील व्यवसाय संधींची माहितीही देण्यात येईल. ही कार्यशाळा शेतकऱ्यांना उत्पादनक्षम व नफ्याची कांदा शेती करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार असून, इच्छुकांसाठी सहभाग पूर्णपणे विनामूल्य आहे.

ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने
ॲमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कोणती कागदपत्रे लागतात, किती दिवस लागतात, हे सर्व करून बिझनेस कसा वाढवायचा, ॲमेझॉनवर विक्री करण्यास किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे, आदींबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २९ नोव्हेंबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स असतील तर ते कसे हाताळावे, ॲमेझॉन ॲपवर उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील जेणेकरून विक्री वाढेल, सवलती कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, तत्काळ सपोर्ट कसा घ्यायचा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

व्यावसायिक चाट, स्नॅक्स कार्यशाळा
चटपटीत चाट व स्नॅक्सचा व्यवसाय सुरू करायचा असल्यास नेमकी काय पूर्वतयारी करावी, याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २९ आणि ३० नोव्हेंबरला होणार आहे. यामध्ये स्पेशल मिसळ, कट वडा, शाबू वडा, उपवासाचे पॅटीस व मिसळ, व्हेज बॉल्स, चीज कटलेट, वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या व पराठ्याचे प्रकार कसे करावेत, हे प्रात्यक्षिकासह शिकवले जाणार आहे. तसेच चाट स्पेशल पदार्थांमध्ये गोड व हिरवी चटणी, पाणीपुरी, आलू दहीपुरी, रगडा पॅटीस, मटकी भेळ, कोल्हापुरी स्पेशल भेळ, आलू टिक्की चाट, पकोडा चाट, इडली चाट, कॉर्न चाट, चना चाट, पापड चुरी चाट, पापडी चाट, दही वडा इत्यादी पदार्थ शिकवले जातील. व्यवसायाची सुरुवात, नोंदणी, ब्रॅण्डिंग, अन्न सुरक्षा मानके आदींबाबत माहिती दिली जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com