सहकार पुरस्कार प्रस्तावासाठी १८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

सहकार पुरस्कार प्रस्तावासाठी १८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Published on

पुणे, ता. १० ः सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना सहकार पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, संस्थांनी सोमवारपर्यंत (ता. १८) अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यासाठी सरकारने सहकार पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. यासाठी यापूर्वी ३१ जुलैपर्यंत प्रस्तावाची मुदत देण्यात आली होती, मात्र आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये अधिकाधिक सहकारी संस्थांना पुरस्कार मिळण्याकरिता प्रस्ताव सादर करता यावेत, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक सहकारी संस्थांनी सविस्तर प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या सहायक निबंधक, सहकारी संस्था किंवा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्ह्याचे अपर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com