महात्मा फुले आरोग्य योजना ठरली संजीवनी
पुणे, ता. १५ : महात्मा फुले जन आरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) गेल्या तीन वर्षांत पुणे जिल्ह्यातील हजारो रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने ‘संजीवनी’ ठरली आहे. जिल्ह्यातील विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या ८६ हजार रुग्णांवर या योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात आले असून, यासाठी सरकारने सुमारे २७३ कोटी रुपयांचा खर्च केला आहे.
राज्य सरकारने गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही योजना २०१२ मध्ये ‘राजीव गांधी जीवनदायिनी आरोग्य योजना’ म्हणून सुरू झाली होती आणि २०१७ मध्ये महात्मा जोतिराव फुले यांचे नाव देण्यात आले. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील कुटुंबांना आरोग्य सेवा सुलभ आणि मोफत उपलब्ध करून देणे आहे. पात्र कुटुंबांना पाच लाखांपर्यंत वार्षिक आरोग्य कवच दिले जाते, ज्याचा वापर कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य करू शकतात. या योजनेत ३४ विशेष शाखांमधील उपचार समाविष्ट आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही प्रतीक्षा कालावधी नाही, म्हणजेच पूर्वीचे आजार देखील त्वरित केले जातात. यामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवा बळकट झाली असून, अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात वाढता खर्च आणि खासगी रुग्णालयांचे वाढते दर लक्षात घेता, महात्मा फुले जन आरोग्य योजना खरंच पुणेकरांसाठी आरोग्याची संजीवनी ठरत आहे.
महत्त्वाचे
- महात्मा फुले योजनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी रुग्णसंख्या वाढत आहे
- पुणे शहर, पिंपरीसह जिल्ह्यात या योजनेशी २१० रुग्णालये संलग्न
- योजनेअंतर्गत एकूण उपचारांची व प्रक्रियांची (प्रोसिजर) संख्या १३२६
- उपचारांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व रेशन कार्डची गरज भासते
- यामध्ये २०२२-२३ मध्ये २३ हजार ८३८ रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला
- २०२३-२४ मध्ये हा आकडा वाढून २८ हजार ५००वर पोहोचला
- चालू वर्षात म्हणजेच २०२४-२५ मध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत ३३ हजार ७४९ रुग्णांवर मोफत उपचार
- कर्करोग, हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार, अपघात या आजारांवरील उपचारांची संख्या सर्वाधिक
पुणे जिल्ह्यातील उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या
वर्ष - लाभार्थी संख्या - झालेला खर्च
२०२२-२३ - २३ हजार ८३८ - १०५ कोटी
२०२३-२४ - २८ हजार ५०० - १०० कोटी
२०२४-२५ - ३३ हजार ७४९ - ६८ कोटी
एकूण - ८६ हजार ८७ - २७३ कोटी
महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राचीच आयुष्मान भारत योजना एकत्रित करून राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने यंदा चार हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली असून, सध्या १३२६ प्रकारच्या आजारांचा समावेश असलेल्या योजनेत उपचारांची संख्या दुप्पट केली जाणार आहे. अधिक खासगी रुग्णालये योजनेत सहभागी व्हावीत म्हणून उपचार दर वाढविण्याचा प्रस्ताव असून, रुग्णालयांना या शस्त्रक्रियांसाठी दर महिन्याला मंजूर बिलांचा निधी मिळेल.
- डॉ. ओमप्रकाश शेटे, अध्यक्ष, आयुष्मान भारत मिशन समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.